Allahabad Court : Gyanvapi-Kashi Vishwanath case :  Sarkarnama
देश

Gyanvapi Case : उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मुस्लीम पक्षकारांच्या सर्व याचिका फेटाळल्या

Rajanand More

Allahabad High Court : ज्ञानवापी मशिदीमध्ये हिंदूंना पूजा करण्याबाबतच्या याचिकेला विरोध करणाऱ्या मुस्लीम पक्षकारांच्या सर्व याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावल्या. मुस्लीम पक्षकारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि अंजुमन इंतेझामिया मस्जिद कमिटीसह आणखी जवळपास पाच याचिका होत्या. न्यायालयाने वाराणसी न्यायालयाला सहा महिन्यांत संबंधित याचिकांवर सुनावणी पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत.

वाराणसीमधील (Varanasi) ज्ञानवापी मशीद (Gyanvapi mosque) आणि काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwanath Temple) यांच्यातील हा वाद 1991 पासून आहे. 2021 मध्ये काही महिलांनी एकत्रित येऊन ज्ञानवापी संकुलात पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिका जिल्हा न्यायालयात केली होती. त्यानंतर न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्याविरोधातही याचिका दाखल करण्यात आली होती.

अलाहाबाद उच्च न्यायालयात मुस्लीम पक्षकारांकडून पाच याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तीन याचिका ज्ञानवापी मशीद कमिटीच्या तर दोन याचिका उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाच्या होत्या. 1991 मध्ये न्यायालयात दाखल याचिकेविरोधात तीन याचिका होत्या. ज्ञानवापी मशीद अनधिकृत असून आधी तिथे मंदिर होते, असा दावा 1991 मधील याचिकेत करण्यात आला आहे. त्याला आव्हान देण्यात आले होते.

न्यायाधीश रोहित रंजन अगरवार यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश म्हणाले, 1991 मध्ये वाराणसी न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू राहील. ही याचिका प्रार्थनास्थळे (विशेष तरतुदी) कायदा 1991 (The Places of Worship (Special Provisions) Act 1991) अंतर्गत याचिका फेटाळता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वेक्षणाविरोधातील याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT