Parliament Security Investigation : संसद घुसखोरीवरुन मोठा खुलासा; सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारची गंभीर चूक!

Parliament Security Staff Issue : केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना पत्र पाठवण्यात आले...
Parliament Security Investigation :
Parliament Security Investigation : Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : लोकसभा सभागृहाची सुरक्षा भेदून घुसखोरी झाल्याच्या प्रकरणात कसूर राहिल्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय संसद सुरक्षा सेवा (PSS) चाही आढावा घेतला जात आहे.

पीएसएस केडर संसदेच्या आत लोकांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवते. याशिवाय संसदेतील व्हीव्हीआयपी लोकांच्या सुरक्षेबाबत समन्वयाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार पीएसएस मध्ये सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सुरक्षेबाबत त्यांच्याकडे असलेले तंत्रज्ञानही जुने झाले आहे. (Latest Marathi News)

Parliament Security Investigation :
Youth Congress : मोदी सरकारच्या रथाला युवक काँग्रेसकडून काळे झेंडे ; श्रीगोंद्यातील राजकीय वातावरण तापले!

'पीएसएस'साठी मंजूर झालेल्या टीमच्या संख्येपेक्षा प्रत्यक्षात त्यामधील सदस्यांची संख्या खूपच कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संसदेत येणारे लोक, वाहने आणि सामानाची तपासणी करणारे, प्रवेश स्तरावरील सुरक्षा चौक्यांवर किमान कर्मचारी तैनात केले जातात. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पहिली पायरी आहे. अहवालात म्हटले आहे की, लोकसभेसाठी 72 सुरक्षा सहाय्यक ग्रेड 2 अधिकारी असावेत, परंतु सध्याची संख्या फक्त 10 आहे. प्रवेश स्तरावरील तांत्रिक कर्मचार्‍यांसाठी 99 सुरक्षा सहाय्यक ग्रेड 2 (टेक) ची मंजूर संख्या 99 आहे, परंतु ही संख्या आता केवळ 39 आहे.

Parliament Security Investigation :
Hasan Mushrif : केंद्र सरकारचा मोठा निर्णय इथेनॉल निर्मीतीवरची बंदी उठवली | Kolhapur

69 ऐवजी 24 कर्मचारी -

लोकसभेत संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचार्‍यांची दुसरी तुकडी तैनात असते. यासाठी एकूण 69 कर्मचारी मंजूर असले तरी सध्या ते केवळ 24 इतकेच आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून संयुक्त सचिव (सुरक्षा) हे पद रिक्त आहे, ज्या अंतर्गत पीएसएस लोकसभा आणि राज्यसभेच्या सुरक्षेसाठी काम करते. सुरक्षेतील त्रुटींच्या घटनेच्या एका दिवसानंतर केंद्र सरकारने याबाबत पावले उचलली आणि या पदांच्या भरतीच्या अनुषंगाने सर्व राज्यांना पत्र पाठवले. दुसरीकडे एवढे महत्त्वाचे पद रिक्त का ठेवण्यात आले? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

आतापर्यंत 6 आरोपींना अटक -

संसदेतील घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे. सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम देवी, ललित झा आणि महेश कुमावत अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध कठोर बेकायदेशीर युएपीए कायद्याअंतर्गत (UAPA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपींच्या सोशल मीडिया अकाउंट्स निष्क्रिय करण्यासाठी, फेसबुक पेज भगत सिंग फॅन क्लबचे तपशील मिळवण्यासाठी मेटाला पत्र लिहिले आहे. हे सर्व आरोपी 'भगतसिंग फॅन क्लब'च्या माध्यमातूनच एकमेकांच्या संपर्कात आले होते. 13 डिसेंबरची घटना घडवून आणण्यासाठी त्यांनी कोणाकडून पैसे घेतले आहेत का? हे शोधण्यासाठी पोलिसांनी सर्व आरोपींच्या बँक खात्याचे तपशीलही गोळा केले आहेत, अशी माहिती पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com