Gyanvapi Masjid Case sarkarnama
देश

ज्ञानवापी मशीद वाद; वाराणसी कोर्टात सुनावणी पूर्ण; मंगळवारी येणार निकाल

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हे प्रकरण वाराणसी (Varanasi) कोर्टाकडे वर्ग केले होते.

सरकारनामा ब्यूरो

वाराणसी : ज्ञानवापी मशीद वाद (Gyanvapi Masjid Case) प्रकरणाची आज (ता.२३) जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. उद्या, मंगळवारी दुपारी २ वाजता हा निकाल सुनावण्यात येणार आहे. त्याच बरोबर पुढील सुनावणी कशी होणार, याची रूपरेषा काय असेल, हे उद्या सांगण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हे प्रकरण वाराणसी (Varanasi) कोर्टाकडे वर्ग केले होते. सर्वोच्च न्यायालयाने ८ आठवड्यात सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. (Gyanvapi Masjid Case)

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरु झाली. दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयातील सर्व फायली जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात पोहोचल्या आहेत. मात्र, त्या फायली अद्याप पाहावयाच्या आहेत. दोन्ही बाजूंनी आपापल्या मागण्या मांडल्या मात्र न्यायालयाने कोणताही निर्णय न देता सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली आहे.

दोन्ही बाजूंनी आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने उद्या दुपारी २ वाजेपर्यंत निर्णय राखून ठेवला. मंगळवारी अन्य पुरवणी याचिकांवरही विचार करण्याचे न्यायालयाने ठरवले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीची प्रक्रिया काय असेल हे मंगळवारी न्यायालयाला सांगण्यात येणार आहे. हिंदू पक्षाने न्यायालयाकडे आयोगाचा अहवाल फोटो आणि व्हिडिओची मागणी केली आहे.

न्यायालयीन सुनावणी सुरू होण्यापूर्वी न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोरीला बॅरिकेड करून केवळ पक्षकार आणि वकिलांनाच प्रवेश दिला गेला. सर्वेक्षणासाठी यापूर्वी नियुक्त केलेले न्यायालयाचे आयुक्त अजय मिश्रा यांचे नाव यादीत नसल्याने त्यांना परत पाठण्यात आले. मागील सुनावणीदरम्यान अजय मिश्रा यांना आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. न्यायाधिशांनी न्यायालयात येणाऱ्यांची पोलिसांना यादी दिली. या यादीच्या आधारेच न्यायालयात प्रवेश देण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT