Hardoi man complains against Indradev : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असताना, पावसासाठी थेट हिंदू देवता इंद्र यांना जबाबदार धरत एका नागरिकाने प्रशासनाकडे अनोखी तक्रार दाखल केली आहे.
इंद्रदेव सतत पाऊस पाडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाने आपल्या ‘दैवी संपर्कांचा’ वापर करून पाऊस थांबवावा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
हरदोई जिल्ह्यातील (Uttar Pradesh) मल्लावन तालुक्यातील नेवाडा परस गावातील रहिवासी सूरज तिवारी यांनी 26 सप्टेंबर रोजी राज्याच्या सार्वजनिक तक्रार निवारण पोर्टलवर ही तक्रार दाखल केल्याचे वृत्त आहे.
तक्रारीत तिवारी यांनी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा उल्लेख केला आहे. इंद्रदेव कोणतीही पूर्वसूचना न देता सातत्याने पाऊस (Rain) पाडत असल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, मला इंद्रदेवांचा मोबाइल क्रमांक माहीत नाही, असा उल्लेख करत तिवारी यांनी प्रशासनाकडे वेगळीच मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आपल्या ‘दैवी संपर्कांचा’ वापर करून इंद्रदेवांना पाऊस नियंत्रित करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
तिवारी यांच्या या तक्रारीनंतर तिची माहिती समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. त्यामुळे या अनोख्या तक्रारीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, हरदोई जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने अनेक भागांतील जनजीवनावर परिणाम झाल्याचे वृत्त आहे. याच पार्श्वभूमीवर पावसाबाबत करण्यात आलेल्या या अनोख्या तक्रारीने लक्ष वेधून घेतले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.