Harish Salve News Sarkarnama
देश

Harish Salve News: विरोधकांच्या लढ्यावरच प्रश्नचिन्ह..? देशातील आंदोलनासाठी परदेशातून 'फंडिंग', नेपाळ, बांगलादेश करण्याचं षडयंंत्र; हादरवणारा आरोप

Indin Alliance Protest: ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी विरोधी पक्षांसह सीजेपीच्या आंदोलनावरुन धक्कादायक आरोप केले आहेत. ते म्हणाले, आपल्या देशात असामान्य गोष्टी घडत आहेत. एका वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे मोठा वाद निर्माण केला जात आहे.

Deepak Kulkarni

London News: देशातील विरोधी पक्षाच्या काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीसह कॉक्रोच जनता पार्टीकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि एसआयआर (मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण) प्रक्रियेविरोधात मोठा लढा उभारला आहे. तीव्र आंदोलनांनंतर आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी थेट सर्वोच्च न्यायालय गाठत याबाबत आता रिट याचिका दाखल केली आहे. याचदरम्यान, आता भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी खळबळजनक दावा केला आहे.

ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी विरोधी पक्षांसह सीजेपीच्या आंदोलनावरुन धक्कादायक आरोप केले आहेत. ते म्हणाले,आपल्या देशात असामान्य गोष्टी घडत आहेत. एका वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे मोठा वाद निर्माण केला जात आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात येत्या 10 दिवसांत सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग आपले उत्तर दाखल करेल आणि संबंधित कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करेल. कोणतीही अनियमितता झाली आहे का आणि झाली असल्यास त्यावर काय कारवाई करण्यात आली,याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार असल्याचं साळवे यांनी म्हटलं आहे.

मात्र, दिल्लीत दररोज गोंधळ निर्माण करण्याची गरज आहे का? तेथील नागरिकांना त्रास देणे आवश्यक आहे का? सणासुदीचा काळ जवळ येत आहे. या आंदोलनांमुळे व्यवसायांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.त्याचमुळे दिल्लीतील व्यावसायिक मोठ्या चिंतेत आहेत. राजकारण करताना आपण सर्वसामान्य जनतेची सोय आणि सुख-सुविधांचाही विचार केला पाहिजे,असं हल्लाबोल साळवे यांनी केला.

ज्येष्ठ वकील आणि देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्याच्या निर्णयावरुन जोरदार शा‍ब्दिक हल्ला चढवला. त्यांनी विरोधकांच्या या कृतीला ‘निव्वळ मूर्खपणा’ असल्याचं संबोधले आहे.तसेच सर्वोच्च न्यायालयाचा वापर राजकीय साधन म्हणून केला जात असल्याचा गंभीर आरोपही साळवे यांनी केला आहे.

तसेच दिल्लीतील आंदोलनामागे परदेशी निधी असल्याचा खळबळजनक दावा ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी केला आहे. ते म्हणाले,भारतातील काही आंदोलनांमागे परदेशी निधी आणि बाह्य हस्तक्षेप होतो आहे. देशातील व्यवस्थेला अस्थिर करण्याचं आणि भारताच्या प्रगतीत अडथळे निर्माण करण्याचं प्रयत्न सुरू आहे.

नेपाळ,श्रीलंका आणि बांगलादेश यांसारख्या शेजारील देशांमध्ये अलीकडच्या काळात ज्या काही अराजकता पसरवून घडलेल्या घटनांमधून जसा बाह्य हस्तक्षेपाचा एक विशिष्ट पॅटर्न दिसून येत आहे, तेच भारतातही घडवून आणण्याचं षडयंत्र असल्याचं साळवे यांनी म्हटलं आहे. काही परदेशी देश, विशेषतः अमेरिका,भारतावर नाराज असल्याचा आरोप साळवे यांनी केला.

हरीश साळवे म्हणाले,माझा असा विश्वास आहे की, काही आंदोलनांसाठी आयोजन करण्यासाठी परदेशातून निधी पुरवला जात आहे.देशात अराजकता पसरवण्याच्या प्रयत्नांसाठी परदेशातून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे.तेथूनच तीव्र आंदोलनांसारख्या गोष्टींना चिथावणी दिली जात आहे.हा माझा आरोप असल्याचं त्यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT