Harish Salve : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सत्ता राखणाऱ्या हरीश साळवेंची दिवसाची कमाई किती ?

Supreme Court Final Decision on ShivSena : सत्तासंघर्षावर चालू असलेल्या सुनावणीमध्ये शिंदे गटाची बाजू मांजणारे हरीश साळवे कोण?
Harish Salve, uddhav Thackeray
Harish Salve, uddhav ThackeraySarkarnama

Supreme Court Decision : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल काल (11 मे) सुप्रीम कोर्टाचा जाहीर झाला.या निकालानुसार एकनाथ शिंदे यांचं सरकार कायम राहणार, हे स्पष्ट झालं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदेंची बाजू हरीश साळवे यांनी सक्षमपणे मांडली.

शिंदे गटाची बाजू मांडताना हरीश साळवे यांनी शिंदे गटाच्या बाजूने अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. एकनाथ शिंदे यांच सरकार राहण्यामागे हरीश साळवे यांना मोठ श्रेय आहे. साळवे हे देशातील सर्वात प्रसिद्ध वकिलांपैकी एक मानले जातात आणि सर्वसामान्यांचा एक समज आहे की, त्यांनी घेतलेला खटला ते जिंकतातचं.

Harish Salve, uddhav Thackeray
Sameer Wankhede : नवाब मलिकांसह शाहरूख खानला अडचणीत आणणाऱ्या समीर वानखेडेंच्या घरावर सीबीआयचे छापे!

हरीश साळवेंची कारकीर्द

हरीश साळवे Harish Salve यांचा जन्म धुळे जिल्हातील वरूड या गावात झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून 'एलएलबी'चे शिक्षण घेतले. साधारण 1980 मध्ये त्यांनी वकिलीची सुरुवात केली.हरीश साळवे यांचे नाव केवळ देशातच नाही तर जगातील सर्वात मोठ्या वकिलांमध्ये घेतले जाते. घरातूनच वकिलीचं बाळकडू मिळालं. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात वकील होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते.

साळवे हे नाव देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये 43 व्या क्रमांकावर आहे. काही अहवालांनुसार त्यांचे एका दिवसाचे कामाचे शुल्क हे 30 लाखांच्या घरात आहे. हरीश साळवी हे प्रत्येक तासाला काही लाख तर एका दिवसासाठी 25 ते 30 लाख रुपये घेत असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, साळवे यांनी याआधी सलमान खान, मुकेश अंबानी, इटली सरकार आणि वोडाफोन तसेच टाटा, महिंद्रा आणि अंबानी यांसारख्या मोठ्या  व्यावसायीकांकडे काम केले आहे. तसेच पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांचा आंतरराष्ट्रीय न्यायालयात बचाव केला होता. देशातील सर्वात महागड्या वकिलांमध्ये गणले जाणाऱ्या साळवे यांनी या प्रकरणात केवळ 1 रुपये फी घेतली होती.

Harish Salve, uddhav Thackeray
Harish Salve on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर..; सत्तासंघर्षावर हरीश साळवेंचा मोठा खुलासा!

सीए ते वकिली

हरीश साळवे हे वकिली करण्याआधी 'सीए' झाले. पण प्रख्यात वकील नानी पालखीवाला यांच्यामुळे प्रभावित झालेल्या साळवे यांनी 'सीए' झाल्यानंतर वकिलीचे शिक्षण घेतले. 1992 मध्ये ते सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील बनले आणि 1999 मध्ये त्यांना सॉलिसिटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com