Deepender Singh Hooda, Kumari Shailaja Sarkarnama
देश

Kumari Shailaja Vs Deepender Hooda : दोन खासदारांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कलगीतुरा; काँग्रेसमध्ये फुटू लागले फटाके  

Rajanand More

Chandigarh :  लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षित यश मिळाल्यानंतर नेत्यांचाही आत्मविश्वास भलताच वाढला आहे महाराष्ट्रासह हरियाणामध्येही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधीच काँग्रेसमध्ये नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हरियाणामध्ये लोकसभेत काँग्रेसने चांगली कामगिरी गेली. त्यामुळे विजयाचे श्रेय घेत मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यासाठी नेत्यांची चढाओढ सुरू झाली आहे. काँग्रेसच्या खासदार कुमारी शैलजा जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यात पदयात्रा काडणार आहे. त्यामाध्यमातून त्या शहरी भागात पक्षाचा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

कुमारी यांच्याआधी पक्षाचे दुसरे खासदार दीपेंद्र सिंह हुडा यांची पदयात्रा सुरू झाली आहे. हे दोघेही मुख्यमंत्रिपदाची दावेदाव मानले जात आहेत. त्यामुळे शैलजा कुमारी यांना हुडा यांच्या पदयात्रेविषयी विचारले असता त्यांनी त्यांचं काय सुरू आहे, ते मला माहिती नाही, असे विधान केले.

कुमारी शैलजा या काँग्रेसच्या महासचिवही आहेत. पदयात्रेविषयी मीडियाशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘ही पदयात्रा प्रदेश काँग्रेस कमिटी काढत आहे की इतर कुणी, हे मला माहिती नाही. मी तिथे नव्हते. ते काय करत आहेत, माहिती नाही.’ हुडा हे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह यांचे पुत्र आहेत.

लोकसभेत पाच जागा जिंकल्याने पक्षाला विधानसभा निवडणुकीतही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्यामुळे नेत्यांनी आतापासून मुख्यमंत्रिपदाची तयारी सुरू केली आहे. शैलजा यांनी हुडा यांच्यावर नाव न घेता अविश्वासही व्यक्त केला आहे.

राज्यात संघटनात्मक पातळीवर सर्वकाही पूर्वीप्रमाणेच सुरू राहिले तर विधानसभेत अपेक्षित परिणाम दिसणार नाही. लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल. सध्या एकाधिकारासाऱखी स्थिती वाटत आहे, असे म्हणत शैलजा कुमार यांनी थेट भूपेंद्र हुडा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे या नेत्यांमधील वादाचा फटका पक्षाला विधानसभेत बसण्याची शक्यात व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT