Akhilesh Yadav : 100 आणा, सरकार बनवा..! अखिलेश यादव यांच्या 'मॉन्सून ऑफर'ने वाढवले भाजपचे टेन्शन

Uttar Pradesh Government Samajwadi Party BJP : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. काही नेत्यांकडून विविध मुद्द्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे.
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. पराभवामागची कारणे शोधता-शोधता पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. त्यातच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या वादाला हवा दिली आहे.

अखिलेश यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करून सरकार बनवण्यासाठी भाजपमधील नेत्यांनाच ऑफर दिली आहे. मॉन्सून ऑफर म्हणत त्यांनी 100 आणा आणि सरकार बनवा, अशी थेट ऑफर दिली आहे.

उत्तर प्रदेशातील भाजपच्या कोणत्या नेत्याला अखिलेश यांनी ही ऑफर दिली, यावरून चर्चांना उधाण आले आहे. अखिलेश यांनी यापूर्वीही भाजप नेते केशव प्रसाद मौर्य यांना अशी ऑफर दिली होती. शंभऱ आमदार घेऊन आल्यास समाजवादी पक्ष त्यांना सरकार बनवण्यासाठी मदत करेल, असे ते म्हणाले होते.

Akhilesh Yadav
BJP Politics : भाजप उत्तर प्रदेशामध्ये मोठे बदल करणार; मुख्यमंत्री योगींशी मतभेद असलेल्या नेत्यावर मोठी जबाबदारी?

मौर्य यांनी मात्र ही ऑफर धुडकावत यादव यांच्यावर टीका केली होती. देशात आणि राज्यातही भाजपचे संघटन मजबूत आहे, असे ते म्हणाले होते. पण सध्याची स्थितीत केंद्रात भाजपकडे स्पष्ट बहुमत नाही. तर लोकसभा निवडणुकीतील दणक्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीआधी मोठी डागडुजी करावी लागणार आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये नेत्यांमधील कलह समोर आला. उपमुख्यमंत्री असलेल्या मौर्य यांनी संघटन सरकारपेक्षा मोठे असल्याचे विधान केले होते. तर दुसरीकडे योगींनी अति आत्मविश्वासामुले लोकसभेत फटका बसल्याचे सांगत नेत्यांना सूचक इशारा दिला होता.

Akhilesh Yadav
Karnataka Government News : मोठी बातमी! खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी स्थानिकांना आरक्षणाच्या निर्णयावर सिद्धरामय्या सरकारचा 'U Turn'

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मौर्य यांना नुकतेच दिल्लीत बोलावले होते. सरकार आणि संघटनेने एकत्रितपणे काम करायला हवे, अशा सूचना नड्डांनी दिल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनाही दिल्लीचे बोलावणे आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या पराभवाची कारणे असलेला अहवाल नड्डा यांच्याकडे सुपूर्द केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com