Haryana Congress Sarkarnama
देश

Congress Politics : काँग्रेस 19 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडणार! प्रदेशाध्यक्षांच्या दाव्याने भाजपला टेन्शन

Udaybhan Singh Congress Haryana Assembly Election : एक्झिट पोलनुसार हरियाणात काँग्रेसला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Rajanand More

Chandigarh : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात चमत्कार घडेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. एक्झिट पोलच्या आकड्यांनी या नेत्यांचा विश्वास दुणावला आहे. पक्ष राज्यात 19 वर्षांपूर्वीचाही रेकॉर्ड मोडेल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे भाजपचे टेन्शन आणखी वाढले आहे.

हरियाणामध्ये शनिवारी विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान झाले. त्यानंतर विविध एक्झिट पोलमध्ये राज्यात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलचे आकडे समोर आल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष उदयभान सिंह यांची प्रतिक्रिया आली.

सिंह यांनी पक्षाला राज्यात किमान 70 जागा मिळतील, असा दावा केला आहे. ते म्हणाले, 2005 मध्ये काँग्रेसला 67 जागा मिळाल्या होत्या. यावेळी हे रेकॉर्ड मोडला जाईल. माझ्या अंदाजानुसार काँग्रेसला जवळपास 70 जागा मिळतील. एक्झिट पोलमध्ये 60, 62, 64 अशा जागा दाखवल्या जात आहेत.

भाजप नेते खोटं बोलत आहेत

भाजपवर टीका करताना उदयभान सिंह म्हणाले, भाजपचे नेते सातत्याने खोटे बोलत आहेत. लोकांनी त्यांना ओळखले असून मतदानातून उत्तरही दिले आहे. भाजपच्या 10 वर्षांच्या सरकारचा बुरखा फाडण्याचे काम आम्ही केले. हरियाणाला हवा हिशेब या अभियानातून त्यांचा पर्दाफाश करण्यात आला.

काँग्रेसवर लोकांचा विश्वास

काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा यांनी रविवारी मीडियाशी बोलताना काँग्रेसवर हरियाणातील लोकांनी विश्वास दाखवला असल्याची प्रतिक्रिया दिली. एक्झिट पोल तर काल आले आहेत. मी तर आधीपासून म्हणत आहे की, लोकांनी काँग्रेसला बहुमताने सत्तेत आणण्यासाठी मन बनवले आहे. लोकांनी 2005 ते 2014 मध्ये काँग्रेसचे काम पाहिले आणि आता 2014 ते 2024 दरम्यान भाजपचे अपयश पाहिले. त्यानंतर लोकांनी काँग्रेसवर विश्वास दाखवल्याचे हुडा यांनी सांगितले.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT