Haryana Assembly Election Result 2024 Sarkarnama
देश

Haryana Assembly Result 2024: टायमिंग चुकले! भाजपची साथ सोडलेल्या तीन नेत्यांचे राजकीय भवितव्य अंधारात?

Mangesh Mahale

राजकारणात टायमिंगला फार महत्व असते. टायमिंग साधत निर्णय घेणे, हे राजकारणात नवीन नाही, पण कधी कधी हे टायमिंग चुकले की पश्चातापाची वेळ येते, अशीच परिस्थिती भाजपची साथ सोडणाऱ्या तीन बड्या नेत्यांची झाली आहे. हरियानामध्ये भाजपने तिसऱ्यांदा सत्ता मिळवल्यानंतर अशोक तंवर, बृजेंद्र सिंह, रणजीत चौटाला यांची परिस्थिती तशीच झाली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी या तीनही नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. ऐन विधानसभा निवडणुकीवेळी हे नेते भाजपमधून बाहेर पडले, पक्ष सोडण्याचे आपलं टायमिंग योग्य असल्याचे त्यांना वाटले. पण मतदारांनी त्यांनी धडा शिकवत त्यांचे टायमिंग कसे चुकले हे दाखवून दिले. भूपेंद्र सिंह हु्ड्डा आणि कुमारी सैलजा यांच्यातील वादात काँग्रेसने अशोक तंवर यांच्यावर मोठा डाव लावला होता.

एकेकाळी काँग्रेसमधील बडे नेते अशी अशोक तंवर यांची ओळख होती. ते हरियाणा काँग्रेसचे अध्यक्षही होते. तिकीट वाटपाबाबत हुड्डा यांच्यासोबत वाद झाल्याने तंवर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. काही काळी ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी मध्ये होते. तेथे त्यांचे मन रमले नाही. त्यांनी आम आदमी पार्टी प्रवेश करुन आपले राजकीय भवितव्य मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही.

टीएमसी आणि 'आप'वर नाराज झाल्याने ते भाजपवासी झाले. सिरसा येथून कुमारी सैलजा यांनी त्यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीत त्यांनी टाईमिंग साधत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसची सत्ता येईल, असे त्यांना वाटले पण त्यांचा हा निर्णय चुकला.हिसार येथून माजी खासदार बृजेंद्र सिंह यांनी ही भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसशी 'हात'मिळवली केली. त्या्चा पराभव झाल्याने त्यांचे राजकीय भवितव्य अंधारात असल्याचे बोलले जाते.

रणजीत सिंह चौटाला यांचे तिकीट कापल्याने निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी भाजपची साथ सोडत बंडखोरी केली. सैन्नी सरकारमध्ये ते ऊर्जा मंत्री होते. रानियां विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला.

काँग्रेस सत्तेत येणार म्हणून भाजपने सोडचिठ्ठी दिल्याने या नेत्यांचा पुढील राजकीय भवितव्य काय असेल, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. उचाना विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार बृजेंद्र सिंह यांचा 32 मतांनी पराभव झाला आहे. त्यांना भाजपच्या देवेंद्र चतुर्भुज अत्री यांनी धूळ चारली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT