Mumbai News: सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध योजना जाहीर करुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेवरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाना साधला आहे.
"सत्ताधाऱ्याकडून फेक नरेटिव्ह पसरवले जात आहे. योजनांचा पाऊस पाडून आमचेच पैसे आम्हाला देत आहेत. त्यांनी महाराष्ट्र धर्माशी गद्दारी केली, गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त पंधराशे रुपये" अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारची खिल्ली उडवली. सरकारने वचननामा प्रसिद्ध केला पण त्यांची अमंलबजावणी केली नाही. 'मुलगी शिकली प्रगती झाली, पंधरा रुपये देऊन घरी बसवली,'असे धोरण सरकारने राबवले.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाची चेहरा कोण असेल, यावर सध्या चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वगळता ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "काँग्रेस-राष्ट्रवादीने सीएम पदाचा चेहरा जाहीर करावा," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सूरतेची लुट केली, गुजरातचे 'हे' दोन ठग महाराष्ट्राला लुटत आहे. लुटीच्या पैशातून त्यांनी जाहीराती सुरु केल्या आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरमध्ये राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेत ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. हिंदुत्वावर ठाकरे म्हणाले,"शिवसेनेप्रमुखांचं एक भाषण दाखवा त्यात त्यांनी सर्व मुस्लिम शत्रू असल्याचं म्हटलं. या राष्ट्रात आणि महाराष्ट्रात राहणारे आमचे आहेत. हे आमचं हिंदुत्व आहे. आम्ही जातपात पाहत नाही”,"
"मला काही लोक भेटले. अयोध्येतील लोक हिंदुत्ववादी नाही का. जिथे राम मंदिर बांधलं, घाई घाईत बांधलं, गळकं बांधलं. एवढं होऊनही तुम्हाला राम का पावला नाही. तुमचा पराभव कुणी केला. हे सर्व केलं ते अदानी आणि लोढासाठी केलं का असं त्या लोकांचं म्हणणं आहे. कारसेवकांना अपंगत्व आलं. पुजारी आणि कंत्राटदारही गुजराती का आणत आहे?” असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले.
"मला काही लोक भेटले. अयोध्येतील लोक हिंदुत्ववादी नाही का. जिथे राम मंदिर बांधलं, घाई घाईत बांधलं, गळकं बांधलं. एवढं होऊनही तुम्हाला राम का पावला नाही. तुमचा पराभव कुणी केला. हे सर्व केलं ते अदानी आणि लोढासाठी केलं का असं त्या लोकांचं म्हणणं आहे. कारसेवकांना अपंगत्व आलं. पुजारी आणि कंत्राटदारही गुजराती का आणत आहे?” असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.