CM Nayab Singh Saini, PM Narendra Modi Sarkarnama
देश

BJP Government news : हरियाणातील भाजप सरकार कोसळणार? विधानसभेत अविश्वास ठराव, जाणून घ्या आमदारांचं गणित...

Haryana BJP government crisis : सैनी सरकारला सध्या ५१ आमदारांचा पाठिंबा असून कोणताही धोका नसल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.

Rajanand More

No confidence motion Haryana : हरियाणातील भाजप सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वासदर्शक ठराव दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्षांनीही हा ठराव दाखल करून घेतल्याने आता त्यावर चर्चा करण्यास मुख्यमंत्री नायब सिंह सैनीही यांनीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हरियाणा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन गुरूवारपासून सुरू झाले असून विरोधकांनी पहिल्याच दिवशी ठराव दाखल केल्याने सरकारला धक्का बसला.

हरियाणातील नायब सैनी यांच्या सरकारकडे सध्यातरी पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे सरकारला कसलाही धोका नसल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी चर्चेसाठी वेळ निश्चित केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री सैनी यांनी अविश्वास प्रस्तावावरच आक्षेप घेतला. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांचीच सही नसल्याने हा प्रस्ताव परंपरेनुसार नसल्याचे ते म्हणाले.

हुड्डा यांनी त्यावर प्रत्युत्तर देताना अविश्वास प्रस्तावासाठी १८ आमदारांच्या सह्या असणे गरजेचे असल्याचे सांगितले. दरम्यान, हरियाणा विधानसभेमध्ये एकूण ९० आमदार आहेत. २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला ४८ जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी ४६ जागांची गरज होती. बहुमतापेक्षा दोन आमदार अधिक असल्याने भाजपची सत्ता आली. तीन अपक्ष आमदारांनीही नंतर भाजप सरकारला पाठिंबा दिला.

सैनी सरकारला सध्या ५१ आमदारांचा पाठिंबा असून कोणताही धोका नसल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रस्तावावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वीही मागील चार वर्षांत दोनदा अविस्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. दोन्हीवेळेला विरोधकांच्या पदरी निराशा पडली. १० मार्च २०२१ मध्ये खट्टर सरकारविरोधात आणि २२ फेब्रुवारी २०२४ मध्ये सैनी सरकारविरोधात प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४० जागा मिळाल्या होत्या. जेजेपी पक्षाच्या १० आमदारांना सोबत घेत भाजपने सत्ता काबीज केली होती. त्यानंतर जेजेपीने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकार डळमळीत झाले होते. मात्र, भाजपने जेजेपीचे काही आमदार फोडत पुन्हा सत्ता मिळविण्यात यश मिळविले होते. २०२४ च्या निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्ता मिळाली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT