Local Body Election Result : महाराष्ट्राच्या निकालाआधी उत्तरेकडील राज्यात भाजपची धुळधाण; ‘स्थानिक’च्या निवडणुकीत अपक्षांपेक्षाही कमी जागा

BJP defeat in Punjab : भाजपला केवळ सात जागा जिंकता आल्या आहेत. आपच्या लाटेमध्ये काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांनाही अपेक्षित यश मिळवता आलेले नाही.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

AAP victory : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची धामधुम सुरू असतानाच पंजाबच्या निकालाने भाजपला धक्का बसला आहे. पंजाब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची धुळधाण झाली आहे. एकूण २३ जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला २१ ZP मध्ये भोपळाही फोडता आला नाही. पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अपक्षांपेक्षा कमी जागा मिळाला आहेत.

पंजाबमधील निवडणुकांचे चित्र गुरूवारी रात्री स्पष्ट झाले. त्यानुसार सत्ताधारी आम आदमी पक्षाने राज्यात आपली जादू कायम राखली आहे. पक्षाने २३ पैकी १४ जिल्हा परिषदांमध्ये एकहाती सत्ता काबीज केली आहे. तर अन्य काही जिल्हा परिषदांमध्ये अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळू शकते. जिल्हा परिषदेच्या एकूण ३४७ जागांपैकी आपला २१८ जागांवर विजय मिळाला आहे.

भाजपला केवळ सात जागा जिंकता आल्या आहेत. आपच्या लाटेमध्ये काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांनाही अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. काँग्रेसला केवळ एका तर अकाली दलाला दोन ठिकाणी बहुमत मिळाले आहे. दोन्ही पक्षांना एकुण जागांपैकी अनुक्रमे ६२ आणि ४६ जागांवर यश मिळाले आहे. तर बहुजन समाज पक्षाला तीन आणि अपक्षांना दहा जागांवर विजय मिळवता आला.

BJP
TET issue in Lok Sabha : TET चा मुद्दा तापला, लोकसभेत जोरदार गदारोळ; बहिष्कार टाकण्यापर्यंत आली वेळ

पंचायत समितीच्या निवडणुकीतही आपने करिष्मा दाखविला आहे. एकूण २ हजार ८३८ जागांपैकी तब्बल १५३१ जागांवर आपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर काँग्रेसला ६१२, अकाली दलाला ४४५ आणि भाजपला केवळ ७३ जागा मिळाल्या आहेत. बहुतेक पंचायत समित्यांमध्ये आपने सत्ता काबीज केली आहे. अपक्षांनी १४४ जागा मिळविल्या असून बसपाला केवळ २८ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

BJP
तुकाराम मुंढेंप्रमाणे धडाकेबाज, 'MP'त गाजतोय मराठी IAS अधिकारी; चुकीला माफी नाही...

दरम्यान, पंजाबमध्ये २०२७ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधी झालेल्या स्थानिकच्या निवडणुकीत आपने पुन्हा एकदा अजूनही राज्यात आपलाच दबदबा असल्याचे दाखवून दिले आहे. मागील काही महिन्यांत काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडून आपमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचे आणि विकास थांबल्याची टीका केली जात होती. पण मतदारांनी आपच्या पारड्यात मते टाकत विरोधकांना जागा दाखवून दिली आहे. राज्यात आपची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिकच्या निवडणुका झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com