Manohar Lal Khattar Sarkarnama
देश

Manohar Lal Khattar resigns : हरियाणामध्ये मोठा राजकीय भूकंप; मुख्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

BJP Political News : हरियाणामध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून जेजेपी आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांची आघाडी तुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

Rajanand More

Haryana Political News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar resigns) यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. नायबसिंह सैनी नवे मुख्यमंत्री म्हणून आजच शपथ घेणार असल्याचे समजते. खट्टर यांनी काही वेळापूर्वीच राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.

हरियाणामध्ये (Haryana) भाजप आणि जननायक जनता पार्टीच्या आघाडीचे सरकार होते. पण लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद होता. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली होती. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले होते. त्यामुळे सरकारला धोका निर्माण झाला होता. अखेर जेपीपी पक्षाने अधिकृतपणे सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करण्याआधीच खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

राज्यात भाजपकडे (BJP) 41 आमदार आहेत, तर बहुमतासाठी 46 आमदारांची आवश्यकता आहे. पण त्यांना सात अपक्षांसह इंडियन नॅशनल लोकदल पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांचे संख्याबळ 49 वर जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जेपीपी पक्षाचे दहा आमदार तर काँग्रेसचे 30 आमदार आहेत. जेपीपी सरकारमधून बाहेर पडले तरी भाजप सरकारला धोका नव्हता. पण सरकारडे काठावरील बहुमत राहिले असते. अशातच खट्टर यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

खट्टर लोकसभा लढवणार?

मनोहरलाल खट्टर यांच्या राजीनाम्यामुळे ते लोकसभेच्या रिंगणात उतरणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भाजपने दुष्यंत चौटाला यांच्याशी असलेली युती तोडल्याने राज्यात लोकसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खट्टर यांच्यासह बड्या नेत्यांना मैदानात उतरवले जाऊ शकते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT