Bhupendra Hooda Sarkarnama
देश

Bhupendra Hooda : भूपेंद्र हुड्डांवर काँग्रेसच्याच नेत्याने केला विश्वासघाताचा आरोप; थेट 'हायकमांड'ला कळवत पक्षही सोडला!

Mayur Ratnaparkhe

Haryana Vidhan Sabha Election and Congress : हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. नेत्यांकडून पक्ष बदलाच्या हालाचाली सुरू आहेत. याच दरम्यान सोमवारी काँग्रेसला एक धक्का बसला आहे. येथील सोनीपतच्या राई मतदारसंघाचे माजी आमदार आणि भूपेंद्र हुड्डा यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेस नेते जयतीर्थ दहिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

एवढंच नाहीतर जयतीर्थ दहिया यांनी भूपेंद्र हुड्डा(Bhupendra Hooda) यांच्यावर विश्वासघाताचाही आरोप केला आहे आणि पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. याशिवाय जयतीर्थ दहिया यांच्या समर्थकांनी काँग्रेसला मत न देणार नसल्याचा इशाराही दिला आहे. तसेच काँग्रेसने ज्यांना तिकीटी दिले आहे, दहिया यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

जयतीर्थ दहिया यांनी भूपेंद्र हुड्डा आणि दीपेंद्र हुड्डा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, राई मतदारसंघातून तिकीटाचे वाटप हे देवाण-घेवाणीतू झाले आहे. माजी आमदार दहिया यांनी म्हटले आहे की, मी येथून तिकीटासाठी प्रबळ दावेदार होतो. परंतु काँग्रेसने(Congress) माझे तिकीट कापून अन्य दुसऱ्याला तिकीट दिलं आहे. यासाठी मी काँग्रेस हायकमांडकडे माझा राजीनामा पाठवला आहे.

कोण आहेत जयतीर्थ दहिया? -

जयतीर्थ दहिया हे हरियाणाचे माजी कॅबीनेट मंत्री चौधरी रिजक राम दहिया यांचे पुत्र आहेत. जयतीर्थ दहिया सोनीपतमधील राई विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा आमदारही राहिले आहेत. दहिया हे २०१४मध्ये पहिल्यांदा आमदार बनले होते. त्यानंतर २०१९च्या निवडणुकीतही काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दर्शवला होता आणि दहिया यांनीही ही निवडणूक जिंकली होती.

मात्र यंदा काँग्रेसने सोनीपतच्या राई विधानसभा मतदारसंघातून जय भगवान अंतिल यांना उमेदवारी दिली आहे. येथे त्यांची लढत भाजपचे(BJP) उमेदवार कृष्णा गहलावत यांच्याशी असणार आहे. काँग्रेस उमेदवार जय भगवान अंतिल यांनी दावा केला आहे की, त्यांनी सर्व समाजातून समर्थन मिळत आहे आणि ते विजयी होतील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT