Shyam Rajak : लालूंना झटका देत पुन्हा 'JDU'मध्ये आलेल्या श्याम रजक यांना नितीश कुमारांकडून मोठी जबाबदारी!

Shyam Rajak on Lalu Prasad Yadav : आरजेडी सोडताना श्याम रजक यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर खास अंदाजात टीकाही केली होती.
Shyam Rajak, Nitish Kumar and Lalu Prasad Yadav
Shyam Rajak, Nitish Kumar and Lalu Prasad YadavSarkarnama
Published on
Updated on

Nitishkumar and Shyam Rajak : लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या 'RJD' पक्षाला मोठा झटका देत, 'JDU'मध्ये प्रवेश केलेल्या श्याम रजक यांना नितीशकुमारांनी मोठी जबाबदारी दिली आहे. श्याम रजक यांना जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वीच श्याम रजक यांनी लालू प्रसाद यादव यांचा पक्ष सदसत्यत्वाचा राजीनामा दिला होता. एवढच नाहीतर पक्ष सोडताना रजक यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर खास अंदाजात टीकाही केली होती.

श्याम रजक(Shyam Rajak) यांनी २२ ऑगस्ट रोजी आरजेडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता आणि पक्षही सोडला होता. यानंतर १ सप्टेंबरो रोजी श्याम रजक यांनी नितीशकुमारांच्या जेडीयूमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला होता. पक्षाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष संजय कुमार यांनी त्यांचे जेडीयूमध्ये स्वागत केले होते. जेडीयूसोबत रजक यांची ही दुसरी इनिंग सुरू झाली आहे.

Shyam Rajak, Nitish Kumar and Lalu Prasad Yadav
Shyam Rajak News : 'मैं शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए...' ; लालूंवर आरोप करत श्याम रजक यांचा 'RJD'ला झटका!

जेडीयू(JDU)मध्ये सहभागी झाल्यानंतर श्याम रजक यांनी म्हटले होते की त्यांना, २०२५च्या विधानसभा निवडणुकीत फुलावारी शरीफ या मतदारसंघातून लढण्याची अपेक्षा आहे. एक अशी संधी ज्यामुळे ते २०२०मध्ये विधानसभा निवडणुकीत लालू यादव यांच्या नेतृत्वातील आरजेडीसोबत जुडल्यामुळे वंचित राहिले होते.

श्याम रजक यांनी त्यांचे राजकीय करिअर आरजेडीसोबतच सुरू केले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी ते जेडीयूमध्ये सहभागी झाले. २०२०च्या बिहार निवडणुकीच्या आधी ते आरजेडी(RJD)मध्ये गेले होते. आरजेडीच्या तिकीटावर त्यांना फुलवारी शरीफ विधानसभा मतदारसंघातून तिकीटाची अपेक्षा होती. परंतु त्यांना तेव्हा संधी दिली गेली नव्हती. या मतदारसंघात २०२०मध्ये आरजेडीने माकपा उमेदवार गोपाल रविदास यांना तिकीट दिलं होतं, त्यांनी या जागेवर विजय मिळवला होता.

Shyam Rajak, Nitish Kumar and Lalu Prasad Yadav
Kumari Selja: हरियाणात 'खेला' होणार! ; काँग्रेसच्या कुमारी शैलजा भाजपमध्ये प्रवेश करणार?

श्याम रजक लालूंना काय म्हणाले होते? -

श्याम रजक यांनी लालू प्रसाद यादव(Lalu Yadav) यांना पत्र लिहून म्हटले होते की, मी राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. श्याम रजक यांनी शेवटी खास शायराना अंदाजात आपली तक्रार मांडत लालू प्रसाद यांच्यावर धोखा दिल्याचा आरोपही केला होता. त्यांनी म्हटले होते की, ''मैं शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोखा खा गया। आप मोहरे चल रहे थे, मैं रिश्तेदारी निभा रहा था..''

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com