"Police officials outside the residence of Haryana IGP V Puran Kumar after his alleged suicide; investigation teams reviewing the 9-page note for corruption links." Sarkarnama
देश

IPS death case : पोलिस महानिरीक्षकांच्या आत्महत्येचे गुढ वाढले; 9 पानी सुसाईड नोट अन् लाच प्रकरणातून खळबळजनक खुलासे

Haryana IGP V Puran Kumar Found Dead: Mystery Deepens : आयपीएस पूरन हे मागील आठवड्यापर्यंत रोहतक विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. आठवडाभरापूर्वीच त्यांची सुनारिया पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून बदली करण्यात आली होती.

Rajanand More

Police and Government Launch High-Level Investigation : हरियाणातील पोलिस महानिरीक्षक वाय. एस. पूरन यांच्या आत्महत्येचे गुढ वाढले आहे. पोलिसांना नऊ पानी सुसाईट नोट आढळून आली असून त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे असल्याचे समजते. पूरन यांनी त्यामध्ये काही अधिकाऱ्यांची नावे लिहीत त्यांच्यामुळेच आपल्याला हे टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे म्हटल्याचे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे या आत्महत्येमागे भ्रष्टाचाराचा मुद्दाही प्रकर्षाने समोर आला आहे.

IPS पूरन यांनी त्यांच्या राहत्या घराच्या बेसमेंटमध्ये आपल्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडत आत्महत्या केली. त्यांच्या मुलीला पहिल्यांदा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला होता. पोलिसांकडून सुसाईड नोट आणि मागील काही दिवसांतील घडामोडींचा तपास सुरू करण्यात आला आहे. नोटमधील माहितीनुसार संबंधितांची चौकशी सुरू करण्यात आल्याचेही पोलिसांकडून सांगितले जात आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून पूरन यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. एका मद्य कंत्राटदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार यांच्यावर नुकताच रोहतकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आयपीएस पूरन यांच्यासाठी सुशील कुमारकडून अडीच लाख रुपये लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे.

आयपीएस पूरन हे मागील आठवड्यापर्यंत रोहतक विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. आठवडाभरापूर्वीच त्यांची सुनारिया पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून बदली करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी मद्य कंत्राटदाराने पूरन यांची त्यांच्या रोहतक येथील कार्यालयात भेट घेतली होती. सुशील कुमारला सहकार्य करण्याचे पूरन यांनी त्याला सांगितले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

विशेष म्हणजे सुशील कुमार याला याप्रकरणी रोहतक पोलिसांनी सोमवारीच अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी पूरन यांनी आत्महत्या केली आहे. सुशील कुमार याने पोलिसांना जबाब देताना पूरन यांच्यासाठीच लाच घेत असल्याचा दावा केला आहे. याच प्रकरणामुळे पूरन यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

दरम्यान, पूरन कुमार यांचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विविध मुद्द्यांवरून वाद झाले होते. जातीय भेदभाव, पदोन्नतीमध्ये दुजाभाव, प्रशासकीय कामात होणार छळ आदी मुद्द्यांबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या होत्या. त्यांची नुकत्याच करण्यात आलेल्या बदलीवरूनही ते नाराज होते, अशी चर्चा आहे. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण काय, याबाबतचे गुढ वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT