Haryana Assembly Result Sarkarnama
देश

Haryana Assembly Result : निवडणुकीत पैज लावली अन् काँग्रेस कार्यकर्ता बनला लखपती, 20 लाखांच्या ट्रकसह 6.10 लाख जिंकले

Haryana Assembly Elections Result 2024 Congress Vs INLD : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेससह इतर पक्षांचा सुफडा साफ झाला आहे.

Jagdish Patil

Haryana Assembly Elections Result 2024 : हरियाणा (Haryana) विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेससह इतर पक्षांचा सुफडा साफ झाला आहे.

मात्र, या निवडणुकीच्या निकालामुळे एक काँग्रेस कार्यकर्ता लखपती बनला आहे. आपल्या देशात राजकारण हा अनेकांच्या आवडीचा आणि चर्चेचा विषय आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात आपल्याचं पक्षाचा विजय होणार आणि विरोधी पक्षाचा पराभव होणार असा विश्वास प्रत्येक पार्टीच्या समर्थकाला असतो.

त्यामुळे आपल्या पार्टीचा उमेदवार विजयी होणार अशी पैज अनेक कार्यकर्ते लावत असतात. अशीच पैज हरियाणा (Haryana) विधानसभा निवडणुकीच्या काळात औरंगजेब नावाच्या काँग्रेस कार्यकर्त्याने इंडियन नॅशनल लोक दलाच्या कार्यकर्त्यासोबत लावली होती. तर ही पैज जिंकलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याला 20 लाखांचा ट्रक मिळाला आहे. हे पैजेचे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.

नूह विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आफताब अहमद यांनी INLD उमेदवार ताहिर हुसेन यांचा 20 हजारांहून अधिक मताने पराभव केला तर 'इनेलो'चा (इंडियन नॅशनल लोक दल) समर्थक आपल्याकडे असणारा ट्रक काँग्रेस कार्यकर्त्याला देणार असं ठरलं होतं. या पैजेसाठी दोघांनी शपथपत्र देखील तयार केलं होतं.

शपथपत्रात इंडियन नॅशनल लोक दलाचा कार्यकर्ता युसूफने लिहिलं होतं की, त्यांच्याकडे एक ट्रक असून जर INLD उमेदवार ताहिर हुसेन 20 हजारांहून अधिक मतांनी पराभूत झाले तर तो आपला ट्रक काँग्रेस (Congress) कार्यकर्ता औरंगजेबला देईल. शिवाय आपण पैज हरल्यास ट्रक संदर्भात कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नसल्याचंही त्याने शपथपत्रात लिहिलं होते.

इतकेच नव्हे तर ट्रक आणि 6 लाख 10 हजार रुपये पुरावा म्हणून साक्षीदार खुभी नावाच्या व्यक्तीकडे ठेवले असल्याचंही शपथपत्रात लिहिलं होते. निकालानंतर नूहमध्ये काँग्रेस उमेदवार आफताब अहमद यांचा 46,871 इतक्या मताधिक्याने विजय झाला. त्यामुळे युसूफ पैज हरला. त्यामुळे आता त्याने आपला ट्रक औरंगजेबला दिल्याचं सांगितलं जात आहे.

त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता औरंगजेब चांगलाच मालामाल झाला आहे. दरम्यान, नूह जिल्ह्यात काँग्रेसचं चांगलंच वर्चस्व आहे. कारण या या जिल्ह्यातील विधानसभेच्या तीन पैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. या जिल्ह्यात मुस्लिम मतदारांची लोकसंख्या जास्त आहे. विधानसभेला इथे 74 टक्के मतदान झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT