Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसनं सुनावलं! जागा मागण्यापूर्वी स्वतःची ताकद तपासा

Vijay wadettiwar on NCP sharad pawar party: जागा वाटपाचा निर्णय मेरीटनुसार होईल. जिथे आमची ताकद आहे तेथे काँग्रेसनेच लढावे असे सांगून वडेट्टीवार यांनी केवळ जागा वाढवण्यासाठी जागा मागणार असाल तर त्या मिळणार नाही, असेही अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसला सांगून टाकले.
   
Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: विधानसभा निवडणुकीसाठी महविकास आघाडीत जागा वाटपावरून कुठलाच वाद नाही, 80 टक्के जागा फायनल झाल्या आहेत, असे दावे नेत्यांमार्फत केले जात असले तरी विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र मोठी धुसफूस सुरू असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जागा वाढवण्यासाठी दबाव वाढवत आहेत. आघाडीत बिघाडी होऊ नये, याची काळजी घेतली जात असली तरी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने नव्याने वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विदर्भातील काही मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. याचा अर्थ तेथे काँग्रेसची काहीच ताकद नाही, असा होत नाही. त्यावेळी पराभवाची कारणे वेगळी होती. एवढ्या एका कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघ सोडणे योग्य होणार नाही. आमची ताकद नसेल तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तेथे ताकद किती आहे हेसुद्धा तपासून बघावे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

जागा वाटपाचा निर्णय मेरीटनुसार होईल. जिथे आमची ताकद आहे तेथे काँग्रेसनेच लढावे असे सांगून वडेट्टीवार यांनी केवळ जागा वाढवण्यासाठी जागा मागणार असाल तर त्या मिळणार नाही, असेही अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसला सांगून टाकले.

   
Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Ghansawangi Vidhansabha Election 2024: राजेश टोपेंच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी महायुती लागली कामाला; इच्छुकांमध्ये चुरस

महायुतीत वाद नेहमीचे आहेत. प्रत्येक कॅबिनेटमध्ये त्यांच्याच वाद होतात. राज्याच्या हितासाठी नव्हे तर स्वतःच्या हितासाठीचे वाद सुरू असल्याचा आरोपही यावेळी वडेट्टीवार यांनी केला. राज्याच्या तिजोरीत पैसा नसताना मंत्रिमंडळात धडाधड निर्णय घेतले जात आहेत. त्यांना कोणाची चिंता नाही. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थ विभागात शिस्त निर्माण करण्याचे प्रयत्न केले. मात्र सध्या शिस्त मोडून सर्व काम सुरू आहे. पैसे नसताना जीआर काढले गेले. हे निर्णय टक्केवारी मोजण्यासाठी केले जात आहे. अजित दादांनी कुठे जावे हा त्यांचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने त्यांचे आमदार सोडून जात आहे त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. भाजप नेते अजित दादा यांना साईड ट्रॅक करण्यासाठीच भाष्य करत असल्याचा आरोपही विजय वड्टेटीवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com