H. D. Deve Gowda Refuse Offer :  Sarkarnama
देश

H. D. Deve Gowda Reject Offer : एच.डी. देवेगौडांनी नाकारली G-20 च्या स्नेहभोजनाची ऑफर : कारण...

अनुराधा धावडे

Delhi G-20 Summit 2023 : दिल्लीत होणाऱ्या G-20 शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला केंद्रीय मंत्रिमंडळ, परदेशी प्रतिनिधी, खासदार आणि मंत्री यांच्याशिवाय देशातील काही माजी ज्येष्ठ नेते G-20 डिनरमध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, या डिनरसाठी दोन माजी पंतप्रधानांनाही डिनरचे आमंत्रित करण्यात आले होते. पण माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मात्र या स्नेहभोजनाला आपण जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा G 20 शिखर संमेलनासाठी राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उपस्थितीत राहणार नाहीत. आरोग्याच्या कारणास्तव बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे कारण देवेगौडा यांच्याकडून देण्यात आले आहे. ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे. तसेच, G 20 शिखर परिषद यशस्वी व्हावी, यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

मनमोहन सिंग आणि देवेगौडा यांना आमंत्रण

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच.डी. देवेगौडा यांनाही G-20 शिखर परिषदेच्या डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, देवेगौडा यांनी या स्नेहभोजनाला जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. "प्रकृती कारण देत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-२० शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला बोलवलेल्या स्नेहभोजनास आपण उपस्थित राहू शकत नाही. याबाबत आपण सरकारला आधीच कल्पना दिली आहे. तसेच, G 20 शिखर परिषद यशस्वी व्हावी, यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

या स्नेहभोजनासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. मात्र, अनेक विरोधी मुख्यमंत्र्यांनी सहभागी होण्यास नकार दिला आहे. यात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नावांचा समावेश आहे.

भारतीय संगीत संस्कृतीचे सादरीकरण

दिल्लीतील प्रगती मौदन येथे तयार करण्यात आलेल्या भारत मंडपममध्ये शनिवारी म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 78 कलाकार देशाचा सांगीतिक वारसा पाहुण्यांसमोर सादर करणार आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT