Mumbai : भाजपची आज (शुक्रवारी) दादर येथे बैठक होत आहे. बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार-खासदारांना चार वर्षांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड देण्यात येणार आहे. असमाधानकारक कामगिरी असलेल्या आमदार-खासदारांना कामात सुधारणा करण्यासाठी सूचना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बैठकीस उपस्थित राहणार आहेत. फडणवीस, बावनकुळे प्रत्येक आमदार-खासदारासोबत 'वन टू वन'चर्चा करून कामाचा आढावा घेणार आहेत.
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा व सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. आगामी काळात भाजपकडून निवडणुकीची रणनीती ठरविण्यात येणार आहे.
खासदारांनी चार वर्षात केलेल्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड तयार केले आहे. हे रिपोर्ट कार्ड खासदार व आमदारांना देण्यात येणार आहे. राज्यातील भाजपच्या काही खासदार व आमदारांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे समजते. त्यांच्या कामगिरीत सुधारणा व्हावी, या उद्देशाने हे रिपोर्ट कार्ड देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.