RSS New Office Sarkarnama
देश

RSS New Office: RSS मुख्यालयाचा पता बदलणार? मोहन भागवत करणार 'केशवकुंज' मध्ये लवकरच प्रवेश

Headquarters of Rashtriya Swayamsevak Sangh Established in Delhi: RSSचे मुखपत्र असलेले पंचजन्य आणि 'ऑर्गनाइजर'चे कामही येथून चालणार आहे. दिल्लीतील संघाचे कार्यालयपण या ठिकाणी शिफ्ट होणार आहे.

Mangesh Mahale

सत्ताधारी भाजपचे वैचारिक मार्गदर्शक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नव्या मुख्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या काही दिवसापासून शिफ्टिंग काम सुरु आहे. देशाच्या राजधानीत आरएसएसचे नवे मुख्यालय तयार झाले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत लवकरच दिल्लीतील 'केशवकुंज'या संघाच्या नव्या मुख्यालयात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. झंडेवालान मंदिराजवळ ही इमारत आहे. सुरक्षा व्यवस्थेतबाबतचे मॉकडील नुकतेच करण्यात आले.

बारा मजल्यांच्या 'केशवकुंज'या इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र व 'कम्प्लिशन सर्टिफिकेट' (सीसी) मिळाले आहे. केशवकुंजमध्ये तीन टॉवर असून प्रत्येक टॉवरमध्ये 12 मजले आहेत. यामध्ये एकूण 13 लिफ्ट आहेत. येथे कार्यालयासोबत सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह, सहसरकार्यवाह आणि अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे निवासस्थान असणार आहे. प्रत्येक टॉवरवर 80 खोल्या आहेत.

RSSचे मुखपत्र असलेले पंचजन्य आणि 'ऑर्गनाइजर'चे कामही येथून चालणार आहे. पहिल्या टॉवरमध्ये यांची कार्यालय आहेत. दिल्लीतील संघाचे कार्यालयपण या ठिकाणी शिफ्ट होणार आहे. अडीच एकर परिसरात असणाऱ्या 'केशवकुंज'मध्ये मोठे वाहनतळ उभारण्यात आले आहे. याठिकाणी 200 कार पार्क करता येणार आहेत. या इमारतील 20 खाट्याचे छोटेखानी रुग्णालय उभारण्यात आले आहे.

'केशवकुंज'वर CCTVची नजर असणार आहे, सुरक्षेसाठी CISF चे जवान तैनात असणार आहेत. RSS प्रमुख डॉ.केशव बलिराम हेडगेवार यांचा पुतळा या परिसरात आहे. संघाच्या संबधित विविध संघटना, संस्था यांची कार्यालयही या ठिकाणी असणार आहेत. आठ वर्षांपासून या इमारतीचे काम सुरु होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT