Rahul Gandhi: ठिकाण अन् तारीख ठरली; राहुल गांधी करणार अमित शहांवर पलटवार

Congress leader Rahul Gandhi visit Kolhapur: सामाजिक संघटना, मागासवर्गीय संघटना, आदिवासी संघटनेसोबत राहुल गांधी संवाद साधणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर लगेच राहुल गांधी यांचा दौरा निश्चित झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Rahul Gandhi, Amit shah
Rahul Gandhi, Amit shahSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापुरात येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. त्यांच्या शैलीत समाचार घेत आगामी निवडणुकीत भाजपची सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्रातून शरदराव आणि कंपनीला पराभूत करा,अशा शब्दात शाह (Amit shah)यांनी घणाघात केला होता.

या आरोपांना कोल्हापुरच्या भूमीतूनच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून प्रत्युत्तर मिळणार आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर (Rahul Gandhi visit Kolhapur) येणार असल्याची माहिती आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच एका कार्यक्रमानिमित्त काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

पुढील आठवड्यात कोल्हापुरात संविधान सन्मान संमेलन हा कार्यक्रम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटना, मागासवर्गीय संघटना, आदिवासी संघटनेसोबत राहुल गांधी संवाद साधणार आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर लगेच राहुल गांधी यांचा दौरा निश्चित झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Rahul Gandhi, Amit shah
Shivaji Maharaj Statue Collapsed: शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे कोसळला? समितीकडून धक्कादायक अहवाल

सुरक्षेच्या कारणास्तव शुक्रवारी खासदार राहुल गांधी यांचे पथक कोल्हापुरात येऊन पाहणी करणार आहे. कार्यक्रमस्थळ आणि परिसराची पाहणी करून सुरक्षा तैनात केली जाणार आहे. कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेस नेते गांधी यांच्या हस्ते केले जाणार आहे. यासाठी सर्व प्रकारची तयारी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com