narendra modi photo on covid vaccine certificate
narendra modi photo on covid vaccine certificate  Sarkarnama
देश

मोठी बातमी : कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरुन PM मोदींचा फोटो हटवला जाणार

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : देशातील ५ राज्यांमध्ये निवडणूका जाहिर झाल्यानंतर त्याठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही (Central Government) सावध झाले आहे. गतवेळच्या निवडणुकांवेळी कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या फोटोवरुन झालेला गोंधळ टाळण्यासाठी सरकारने आता तात्काळ पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यानुसार निवडणूक होत असलेल्या ५ राज्यांमधील कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील (Covid Vaccine certificate) पंतप्रधान मोदी यांचा फोटो हटवला जाणार आहे.

५ राज्यांत आचारसंहिता लागू झाल्यामुळे याठिकाणी काही बदल होणार आहेत. त्यापैकी पंतप्रधान मोदींचा कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटो केंद्र सरकारकडून हटवण्यात येणार आहे. यासाठी कोविन प्लॅटफॉर्मवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आवश्यक ते फिल्टरही लावणार आहे. सुत्रांच्या हवाल्याने पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गतवर्षी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी याठिकाणी निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamat Banerjee) यांनी कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधानांचा फोटो हा आदर्श आचारसंहितेचा भंग करणारा आहे असा दावा केला होते. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ऑब्रिएन यांनीही पंतप्रधान मोदी यांचा लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटो हा सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग असल्याची तक्रार केली होती. त्यांनी एक पत्र लिहून निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती.

त्यानंतर नंतर केंद्रीय निवडणुक आयोगाने या संपुर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून निवडणूक नियमावलीचे पालन करणे अपेक्षित असल्याचे म्हटले होते. आयोगाने आरोग्य मंत्रालयाला सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची जाहिरात करणे हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे असे सांगितले होते. त्यानंतर या ५ राज्यांमध्ये लसीकरण प्रमाणपत्र आणि पेट्रोल पंपावरील फोटो हटवण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT