Karnataka Covid Cases Sarkarnama
देश

CM Siddaramaiah: कोविड लशीमुळे तरुणांचा मृत्यू? सिद्धरामय्यांचा दावा ICMR ने काढला खोडून

Karnataka CM Siddaramaiah seeks AIIMS & ICMR report : एक-दोन नाही तर अवघ्या एका महिन्यात 20 युवकांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यापैकी नऊ जणांचे वय हे 30 वर्षांच्या आत आहे.

सरकारनामा ब्यूरो

CM Siddaramaiah: अचानक झालेल्या या मृत्यूमुळे कर्नाटक सरकारची चिंता वाढवली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली आहे. 10 दिवसात याबाबतचा निर्णय देण्यात येणार आहे.

एक-दोन नाही तर अवघ्या एका महिन्यात 20 युवकांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यापैकी नऊ जणांचे वय हे 30 वर्षांच्या आत आहे. मृत्यू झालेल्यांपैकी कुणालाही जुनाट आजार नव्हता. त्यांना अन्य कोणत्याही आजाराची लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे या मृत्यू प्रकरणाचा संबध आता कोविड-19 लसीशी जोडला जात आहे.

अचानक झालेल्या या मृत्यूमुळे कर्नाटक सरकारची चिंता वाढवली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली आहे. 10 दिवसात याबाबतचा निर्णय देण्यात येणार आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या विधानामुळे ते अडचणीत सापडले आहेत. या मृत्यूचे कनेक्शन त्यांनी कोविड-19 सोबत जोडले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कोविड आणि ह्दयविकार यांच्यासंबध असल्याचे उघड झाले आहे, कोविड लशीची अधिक पडताळणी न करता तिला मंजूरी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. फेब्रुवारी महिन्यात सिद्धरामय्या यांनी लशीमुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. आम्हाला विरोध करण्यापूर्वी भाजपला आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. यात राजकारण करु नये, असे सिद्धरामय्या यांनी सुनावलं आहे.

आरोग्य मंत्रालयाने सिद्धरामय्या यांचा हा दावा खोडून काढला आहे. कोविड लशीबाबक शंका उपस्थित करणे, हे चुकीचे आहे, कोविड लस आणि ह्दयविकार यांचा कोणताही संबध नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)नेही मुख्यमंत्र्यांचा हा दावा खोडून काढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT