Shiv Sena: शिवसेना पक्ष अन् 'धनुष्यबाण' कुणाचा? महापालिका निवडणुकीपूर्वी लागणार निकाल

Pune News: शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे.
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Eknath Shinde Vs Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News: शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे.

याच पार्श्वभूमीवर, ठाकरे सेनेने हे प्रकरण आज (२ जुलै) पुन्हा सर्वोच्च न्यायालयात मेंशन केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पक्ष व चिन्हावर लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती कोर्टाकडे करण्यात आली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वकीलानी कोर्टात याबाबत मेंशनिंग करताना सांगितले की, “गेल्या दोन वर्षांपासून प्रकरण प्रलंबित आहे. आता स्थानिक निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे त्याआधी पक्ष आणि चिन्हावरचा निर्णय आवश्यक आहे.”

यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले की, १६ जुलै रोजी हे प्रकरण आधीच बोर्डवर आहे. त्या दिवशीच सुनावणी होईल.” कोर्टाने लवकरच सुनावणीची तारीख निश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Satej Patil: विधिमंडळात 'शक्तीपीठ' वरुन सतेज पाटील आक्रमक; गरज नसलेला महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी का मारता?

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना दोन गटात विभागली. ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनीही शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. याविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे

आज कोर्टात माहिती देताना ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणाले, 'शिवसेना' हे नाव, पक्षचिन्ह धनुष्यबाण. दोन त्रिकोणी शंकू असलेला भगवा झेंडा, डरकाळी फोडणारा वाघ आणि त्याच्याखाली कोरलेले शिवसेना असे वापरण्याचे अधिकार केवळ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आहेत.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Karnataka CM: सिध्दरामय्याचं मुख्यमंत्री राहणार! या 7 कारणांमुळे त्यांची खूर्ची वाचली! डी.के. शिवकुमार यांचे स्वप्न भंगले

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजू 2022 मध्ये पक्षचिन्ह व शिवसेना हे नाव वापरण्याबातचा निर्णय असंवैधानिक असल्याने रद्द करावा, अशी मागणी करणाऱ्या अर्जावर त्वरित सुनावणी घ्यावी, अशी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आज सुप्रीम कोर्टात मागणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमित न्यायपीठासमोर ही सुनावणी आता 14 जुलै रोजी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com