Rahul Gandhi, Hema Malini Sarkarnama
देश

Hema Malini On Rahul Gandhi : राहुल गांधींच्या 'फ्लाईंग किस'वर हेमा मालिनी भलतंच बोलल्या...

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर प्रथमच संसदेत हजेरी लावून चर्चेत सहभाग घेतला. चर्चेदरम्यान 'फ्लाईंग किस' केल्यामुळे राहुल यांना भाजपने पुन्हा घेरले आहे. राहुल गांधींच्या कृतीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी आक्षेप घेतला आहे. यानंतर सत्ताधारी पक्षांच्या २२ खासदारांनी कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र दिले. यावर मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनीही स्वाक्षरी केली आहे. कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या हेमा मालिनी यांनी मात्र आपण राहुल यांना तसे काही करताना पाहिले नसल्याचे सांगितले. (Latest political News)

मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तवावेळी चर्चा करताना राहुल गांधींनी फ्लाईंग किस केल्याचा आरोपावरुन भाजपने बुधवारी गदारोळ केला. यावर काँग्रसच्या वतीने सांगण्यात आले की, पक्षाचे खासदार सर्वसाधारणपणे कोषागार बाकांकडे हातवारे करत होते. ते कोणत्याही मंत्र्याकडे किंवा सदस्यांकडे निर्देशित नव्हते, विशेषतः महिला खासदार. राहुल गांधींनी 'फ्लाइंग किस' केल्यानंतर निघाले त्यावेळी ते 'बंधू आणि भगिनी' असे म्हटले होते. त्यांनी ते कोणत्याही विशिष्ट मंत्री किंवा खासदाराकडे निर्देशित केले नाही. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तर अजिबात नाही."

कारवाई करणाऱ्या हेमा मालिनी यांना फ्लाईंग किस करताना तुम्ही पाहिले का, असे प्रसारमाध्यमांच्या वतीने छेडले असता त्यांनी नकार दिला. हेमा मालिनी म्हणाल्या, "नाही मी त्यांना तसे करताना पाहिलेले नाही. मात्र त्यांनी उच्चारलेले काही शब्द बरोबर नव्हते." यावरून आता काँग्रेस आणि भाजप आमनेसामने ठाकली आहे. गांधींना 'फ्लाईंग किस' करताना पाहिले नसतानाही महिला खासदारांनी कारवाई करण्याची मागणी कशी काय केली, असा प्रश्न काँग्रेसच्या वतीने उपस्थित होऊ लागला आहे.

काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम म्हणाले, "राहुल गांधींनी मणिपूरच्या पूर्ण निष्क्रियतेबद्दल आणि चुकीच्या वागणुकीबद्दल सरकारला काही अत्यंत टोकदार प्रश्न विचारले. सरकार त्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. ही भाजपची 'क्लासिक' रणनीती आहे. प्रत्येक वेळी आम्ही मुद्दाम मांडतो त्यावेळी ते इतिहासात घडलेल्या घटनांचा दाखला देत किंवा ज्यांचा काही संबंध नाही अशा गोष्टींबद्दल बोलून मुद्दा भरकटवतात."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT