Pakistan National Assembly News: पाकिस्तानची संसद बरखास्त, राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; निवडणुकीचा मार्ग मोकळा..

Shehbaz Sharif News: बुधवारी रात्री उशीरा पंतप्रधान यांच्या पत्रावर राष्ट्रपतींनी सही केली.
Pakistan News Latest
Pakistan News Latest Sarkarnama
Published on
Updated on

Pakistan Sansad News: पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी बुधवारी रात्री संसदेचे कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्ली बरखास्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आगामी निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधी बरखास्त करण्याची शिफारस केली होती. शहबाज शरीफ यांच्या शिफासरीनंतर राष्ट्रपती अल्वी यांनी राज्य घटनेच्या अनुच्छेद ५८ नुसार ही कारवाई केली आहे. बुधवारी रात्री उशीरा पंतप्रधानांच्या पत्रावर राष्ट्रपतींनी सही केली.

Pakistan News Latest
Babri Masjid Case : बाबरीप्रकरणी काय घडलं ? ; शरद पवारांनी 'त्या' बैठकीबाबत सांगितलं..; नरसिंह रावांनी भाजपवर विश्वास ठेवला..

नेमक काय घडलं

बुधवारी रात्री उशिरा पंतप्रधान शरीफ यांनी अल्वी यांना नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्यासाठी पत्र पाठवले. काळजीवाहू पंतप्रधान नियुक्तीची प्रक्रिया औपचारिकपणे सुरु केली. त्यानंतर राष्ट्रपतींकडे दोन पर्याय उरले होते. ते एकतर नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्यासाठी ताबडतोब अधिसूचना जारी करणे किंवा 48 तासांसाठी विलंब करु शकतात. त्यांनी पहिला पर्याय निवडला आणि नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याचा आदेश दिला.

Pakistan News Latest
Smriti Irani Challenge To Rahul Gandhi : लोकसभेत पुन्हा खासदार म्हणून आले अन् स्मृती इराणींनी केला राहुल गांधींचा पाणउतारा

90 दिवसांच्या आत निवडणूक..

नॅशनल असेंब्ली वेळेआधी बरखास्त झाल्यास, पाकिस्तानमधील निवडणूक आयोग 90 दिवसांच्या आत निवडणुका घेईल. नॅशनल असेंब्लीने आपला संवैधानिक कार्यकाळ पूर्ण केला असता तर 60 दिवसांच्या आत निवडणुका झाल्या असत्या. या निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर 5 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com