Jharkhand Election : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शनिवारी भाजपच्या 'बंटेंगे तो कटेंगे' या नाऱ्याचा खरपूस समाचार घेतला. हेमंत सोरेन म्हणाले की, आमचे ना विभाजन झाले आहे आणि ना विभाजन होणार आहे, पण हे (भाजप) लोक निवडणुकीच्या माध्यमातून नक्कीच चिरडले जातील. झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागेल, असा दावा ही त्यांनी केला आहे.
ऐन निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत सोरेन यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे खासगी सचिव सुनील श्रीवास्तव अडचणीत आले असून त्यांच्या घरासह इतर नऊ ठिकाणी प्राप्तीकर विभागाने शनिवारी सकाळी छापेमारी केली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत ही छापेमारी झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले आहे की, झारखंड में ना बंटे हैं और न बेटेंगे लेकिन BJP वाले 'कूटे जरूर जाएंगे', राज्याला दिशा देण्यासाठी आम्ही रेखाटलेली रेषा विरोधी पक्षासमोर एवढी मोठी भिंत बनली आहे की, ती भाजपला कधीच ओलांडता येणार नाही.
हवालाच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण झाल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आल्याचे माहिती मिळत आहे. आयकर विभागाने शनिवारी कर चुकवेगिरीच्या चौकशीचा एक भाग म्हणून सोरेनचे (Hemant Soren) खासगी सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या घरी छापे टाकले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईत राज्याची राजधानी रांची आणि जमशेदपूरमध्ये एकूण नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे हेमंत सोरेन यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
आम्ही प्रत्येक गावात अधिकारी पाठवले आणि निकाल खूप समाधानकारक आहेत, असा दावा त्यांनी केला. पूर्वीच्या भाजप सरकारच्या काळात केवळ काही लोकांना वृद्धत्व निवृत्ती वेतन किंवा विधवा पेन्शन मिळत होती आणि ही बाब आमच्या लक्षात आल्यावर आम्ही एक कायदा केला. सर्व वृद्धांना आणि विधवांना पेन्शन द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारच्या योजना केवळ कागदावरच होत्या. आम्ही गावागावात जाऊन लोकांच्या गरजा समजून घेतल्या आणि आता लोकांना योजनांचा लाभ मिळत आहे. आपल्या आघाडी सरकारचे चांगले काम सुरू राहावे यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीत 'झारखंड मुक्ती मोर्चा'ला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.