Jharkhand News: हेमंत सोरेन आज (28 नोव्हेंबर) सायंकाळी 4 वाजता झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची चौथ्यांदा शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यास राहुल गांधी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर हा शपथविधी सोहळा विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या शक्ति प्रदर्शाचा मंचही बनणार आहे. कारण, या शपथविधी सोहळ्यास इंडिया आघाडीचे अनेक दिग्ग्ज नेते हजर राहणार आहेत.
हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी एक एक्स पोस्टमध्ये लिहिले की, ''उद्या होणाऱ्या अबुआ सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला आणिउ उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. तसेच, हेमंत सोरेन यांनी म्हटले की, समारोह स्थळापर्यंत पोहचण्यासाठी आणि वाहनतळाची चोख व्यवस्था असायला हवी. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असायला हव्यात.
प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशिवाय काँग्रेस आणि राजदचे एक-एक मंत्री शपथ घेऊ शकतात. शपथविधी सोहळा रांचीच्या मोरहाबादी मैदानात आयोजित होईल. जिथे भव्य सजावट करण्यात आली आहे. यादरम्यान संपूर्ण राज्यात 50 हजार लोक एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हेमंत सोरेन यांनी या आधी 29 डिसेंबर 2019 रोजी याच मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ति मोर्चाच्या आघाडीने विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रदर्शन करत 81जागांपैकी 56 जागांवर विजय मिळवत, सत्ता कायम राखली. तर दुसरीकडे भाजपच्या (BJP) राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ 24 जागांवर समाधान मानवं लागलं.
राज्याच्या मुख्य सचिव अलका तिवारी यांनी शपथविधी समारंभाची तयारीची माहिती दिली. सोहळ्याच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली गेली आहे. रांचीचे उपायुक्त वरुण रंजन आणि एसएसपी चंदन सिन्हा यांनी बुधवारी मोरहाबादी मैदानात होणाऱ्या समारंभात प्रशासकीय व्यवस्थेसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्व महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.