Manish Sisodia satyendar jain Resigns Minister Post:
Manish Sisodia satyendar jain Resigns Minister Post: Sarkarnama
देश

AAP News : 'आप'च्या सिसोदिया, जैन यांनी या कारणांसाठी दिला राजीनामा

सरकारनामा ब्युरो

Delhi News: आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (manish sisodia) आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (satyendar jain) यांनी आपल्या मंत्रीपदाचा काल (मंगळवारी) राजीनामा दिला आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले मनीष सिसोदिया व सत्येंद्र जैन यांनी राजीनामा देण्याची कारणे समोर आली आहे. जैन हे सिसोदिया यांच्यापूर्वीच मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या मेपासून तुरुंगात आहेत, तर सिसोदिया हे सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. सीबीआयने मनीष सिसोदिया यांना अबकारी धोरण प्रकरणात रविवारी अटक केली होती.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय सिसोदिया यांच्याकडे दिल्लीतील एकूण ३३ पैकी अर्थ, गृह, शिक्षणासारखी १८ खाती होती. जैन यांच्याकडे अटकेपूर्वी आरोग्य, उद्योगसह ७ विभाग होते. केजरीवाल यांनी दोघांचेही राजीनामे स्वीकारले.

सिसोदिया आणि जैन यांनी आरोप फेटाळले असून भाजपचे सुडबुद्धीने आपल्यावर कारवाई केल्याचा दावा या दोन्ही नेत्यांनी केला आहे. आपल्यावरील कारवाईमागे षडयंत्र असल्याचे म्हटलं आहे.

कामावर परिणाम :मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर मंत्रालयातील कामावर त्याचा परिणाम होत होता. सिसोदिया हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री होते तर जैन हे आरोग्यमंत्री होते. दोघांवरही मोठी जबाबदारी असल्याने त्याचा परिणाम महत्वाच्या निर्णयावर होत होता. त्यासाठी त्यांनी राजीनामा दिला आहे.

सिसोदिया यांच्याकडे १८ खाती : उपमुख्यमंत्र्यांसह सिसोदिया यांच्याकडे १८ महत्वाची खाती होती.त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला, पण जैन यांच्या अटकेनंतर त्यांचा राजीनामा आपने घेतला नव्हता. सिसोदिया यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय दबाबामुळे जैन यांनाही राजीनामा द्यावा लागला. जैन यांच्या अटकेनंतर सिसोदिया हे ३३ पैकी १८ विभागाची जबाबदारी सांभाळत होते.

'आप' विचारधारावर प्रश्नचिन्ह : भष्ट्राचाराच्या विरोधात लढणाऱ्या आपच्या नेत्यावरच भष्ट्राचाराचे आरोप झाल्याने त्यांच्या विचारधारेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यावरुन भाजपने 'आप'ला लक्ष्य केले होते.

सीबीआयकडे पुरावे : दारु गैरव्यवहार प्रकरणात सिसोदिया यांच्यावर गंभीर आरोप सीबीआयने केला आहे. त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सीबीआयकडे सिसोदिया यांच्याविरोधात ठोस पुरावे असल्याचा अंदाज 'आप'च्या पक्षश्रेष्ठींना आला आहे. भष्ट्राचाराचा आरोप असलेल्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही, तर यावरुन भाजप टीका करत राहिल, यासाठी दोघांचे राजीनामा घेतल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT