Anup Kesari joins BJP
Anup Kesari joins BJP  Sarkarnama
देश

भाजपचा केजरीवालांना दे धक्का! प्रदेशाध्यक्षांसह तीन बडे नेते फोडले

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने (AAP) पंजाबमधील दणदणीत विजयानंतर आता हिमाचल प्रदेशकडे लक्ष वळवले आहे. यामुळे पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा भव्य रोड शो राज्यात झाला. या रोड शोचा प्रतिसाद पाहून सर्वच राजकीय पक्षांच्या पोटात गोळा आला होता. मात्र, यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने (BJP) केजरीवालांना पहिला मोठा धक्का दिला आहे.

आपचे प्रदेशाध्यक्ष अनुप केसरी आणि संघटन सचिव सतीश ठाकूर आणि उनाचे जिल्हाध्यक्ष इकबालसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. याची माहिती ठाकूर यांनीच ट्विट करुन दिली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीआधीच यामुळे आपला मोठा धक्का बसला आहे. प्रदेशाध्यक्षांनीच पक्ष सोडल्याने आपला नामुष्कीला सामोरं जावं लागत आहे.

केजरीवाल यांनी आमची निराशा केली आहे. आम्ही पक्षसाठी रात्रंदिवस काम करतोय आणि त्यांनी आमच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही. मंडी झालेल्या रोड शोमध्ये फक्त अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाच मानाचं स्थान होतं, असा दावा केसरी यांनी केला आहे. केजरीवालांनी आपच्या कार्यकर्त्यांचा अपमान केल्यानं त्यांनी पक्ष सोडला आहे, असा आरोप ठाकूर यांनी केला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा रोड शो झाला. यानंतर राज्यातील आपमध्ये मोठं वादळ उठलं आहे. केजरीवालांनी कार्यकर्त्यांचा अपमान केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यावरून गदारोळ सुरू असतानाच आपचे प्रदेशाध्यक्ष केसरी हेच आता भाजपच्या तंबूत दाखल झाले आहेत. यामुळे पंजाबनंतर हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या स्वप्नाला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT