Rahul Gandhi, Sukhvinder singh Sukhu Sarkarnama
देश

Congress News : केरळमध्ये शपथविधीच्या काही तास आधी भाजपकडून काँग्रेसला हिमाचल प्रदेशात धक्का; हातातून सत्ता जाणार?

Himachal Pradesh local body elections : हिमाचल प्रदेश भाजपच्या दाव्यानुसार राज्यात २५ नगर परिषदांपैकी १८ नगरपरिषदांमध्ये भाजप समर्थिक उमेदवारांनी बहुमत मिळवत नवा इतिहास घडविला आहे.

Rajanand More

BJP gives shock to Congress in Himachal Pradesh: विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सोमवारी केरळमध्ये यूडीएफ सरकारचा शपथविधी पार पडला. व्ही. डी. सतीशन यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेतेही उपस्थित होते. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिहं सुक्खू यांनीही यावेळी उपस्थिती लावली. पण ते केरळात दाखल होण्याआधीच काँग्रेसला त्यांच्या राज्यात धक्का बसला आहे.

हिमाचल प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधी राज्यात २५ नगरपरिषदा आणि २२ नगर पंचायतींची निवडणूक पार पडली. या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निकालांमध्ये काँग्रेसची पीछेहाट झाल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असलेल्या या निकालांनी काँग्रेसचे टेन्शन वाढविले आहे.

हिमाचल प्रदेश भाजपच्या दाव्यानुसार राज्यात २५ नगर परिषदांपैकी १८ नगरपरिषदांमध्ये भाजप समर्थिक उमेदवारांनी बहुमत मिळवत नवा इतिहास घडविला आहे. त्याचप्रमाणे २२ नगर पंचायतींपैकी १२ ठिकाणी भाजपने एकतर्फी विजय मिळविला आहे.

मुख्यमंत्री आणि मंत्र्‍यांच्या गडात भाजपचा झेंडा रोवण्यात आला असून हा जनतेचा संताप आणि भाजपवरील विश्वासाचा विजय आहे. हा केवळ ट्रेलर असून २०२७ मध्ये भाजपचे सरकार निश्चित येणार असल्याचा विश्वास प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव बिंदल यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री सुक्खू यांनी मंडी आणि कांगडा जिल्ह्यात पक्षाला मोठा विजय मिळाल्याचा दावा केला आहे. मंडीतील सहापैकी चार नगर परिषदांमध्ये काँग्रेस समर्थित उमेदवारांनी बहुमत मिळवले आहे.

तर कांगडा जिल्ह्यातील सर्व सहा नगर पंरिषदा आणि नगर पंचायतींमध्ये पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांनी विजय मिळवत कब्जा केल्याचा दावा मुख्यमंत्र्‍यांनी केला आहे. हे दोन्ही जिल्हे राज्यात महत्वाचे मानले जातात. मंडी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपच्या खासदार कंगना रनौत या करतात.

दरम्यान, या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. निवडणुकीच्या प्रचारात भाजपने काँग्रेसविरोधात रान उठविले होते. पण भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, अशी चर्चा आहे.

काँग्रेसचे महासचिव विनोद जिंटा यांनी राज्यात काँग्रेसने सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठा विजय मिळाल्याचा दावा करत पक्षाने सेमी फायनल जिंकल्याचे म्हटले आहे. भाजप व काँग्रेस दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT