Himachal Pradesh Results 2022
Himachal Pradesh Results 2022 sarkarnama
देश

BJP : हिमाचलमध्ये सत्ता स्थापनेच्या खेळीसाठी 'या' दोन नेत्यांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी

सरकारनामा ब्युरो

Devendra Fadnavis : हिमाचल विधानसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. हिमाचलमध्ये सत्तास्थापन करण्यासाठी भाजपचे रणनीती आखली आहे. हिमाचलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास अपक्षांसह फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोव्यामध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोठी भूमिका बजावली होती, आता हिमाचलमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी फडणवीस आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे.

हिमाचलमध्ये सध्या काँग्रेस ३९ तर भाजप ३० जागांवर आघाडी आहे. भाजपने एका जागेवर विजय मिळवला आहे. काँग्रेस-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोवा राज्याचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. त्या ठिकाणी भाजप सत्तेत येऊन प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री झाले.गोव्यात फडणवीस यांनी सत्तेत येण्यासाठी केलेले डावपेच हिमाचलमध्ये यशस्वी होतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. विधानसभेच्या 68 जागांचे निकाल आज लागणार आहेत. पोस्टल बॅलेटच्या सुरुवातीच्या कलामध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर आहे.

भाजप 30 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेसला 35 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर 4 जागांवर अपक्ष व इतर उमेदवार आघाडीवर आहेत. 'आप'ला अद्याप खाते उघडता आलेले नाही. राज्यात 37 वर्षांची परंपरा कायम राहणार की नवा इतिहास रचणार, हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते.

हिमाचलली 37 वर्षांची परंपरा कायम राहणार की हिमाचलची जनता नवा इतिहास रचणार, याकडे सगळ्याचे लक्ष आहेत. 1985 नंतर राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार पुनरावृत्ती करू शकलेले नाही. त्यानंतर काँग्रेसचे सरकार होते आणि वीरभद्र सिंह मुख्यमंत्री होते. यावेळीही सरकार बदलण्याचा ट्रेंड कायम राहणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याच्या जोरावर भाजप ही प्रथा बदलू शकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT