Hindenburg Research Company Reports Wiped: Sarkarnama
देश

Hindenburg Shut Down: गौतम अडाणींसह उद्योगविश्वाला अडचणीत आणणारी कंपनी बंद; संस्थापकांनी का घेतला हा निर्णय

Hindenburg Research Company Reports Wiped: फॉरेन्सिक फायनान्स रिसर्च, वित्तीय अनियमिततांचा तपास आणि विश्लेषण, अनैतिक व्यावसायिक पद्धतीने आणि गुप्त वित्तीय प्रकरणांची चौकशी ही रिसर्च कंपनी करत होती.

Mangesh Mahale

Pune News: आपल्या अहवालामुळे उद्योगपतींनी अडचणीत आणणारी हिंडनबर्ग ही अमेरिकन रिसर्च कंपनी बंद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीचे संस्थापक नेथन ऊर्फ नेट अँडरसन यांनी कंपनी बंद केल्याची घोषणा केली आहे.

हिंडनबर्गच्या रिसर्च काही रिपोर्टमुळे भारतामधील राजकीय वातावरण अनेकदा तापलं होते. सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत

फॉरेन्सिक फायनान्स रिसर्च, वित्तीय अनियमिततांचा तपास आणि विश्लेषण, अनैतिक व्यावसायिक पद्धतीने आणि गुप्त वित्तीय प्रकरणांची चौकशी ही रिसर्च कंपनी करत होती. हिंडनबर्ग ही कंपनी बंद केल्याची घोषणा काल (बुधवारी) करण्यात आली. खूप चर्चा आणि विचारपूर्वक हा निर्णय घेण्यात आल्याचे अँडरसन यांनी सांगितले.

हिंडनबर्ग च्या अहवालानंतर देशातील अडाणी ग्रुप आणि इकान इटंरप्राइजेजसह अनेक कंपन्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. कंपनीच्या वेबसाईटवरुन याबाबतची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. गेल्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस कुटुंब, मित्रपरिवार यांच्याशी मी चर्चा केली होती. हिंडनबर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला होता, असे अँडरसन यांनी म्हटलं आहे.

ज्या उद्देशाने ही कंपनी स्थापन करण्यात आली होती. तो उद्देश पूर्ण झाला आहे. त्यातून काही कायदेही तयार होत आहेत. उद्योगविश्वातील गैरव्यवहार उघडणीस आणणे हा आमचा उद्देश होता. त्याप्रमाणे आम्ही काम केले. त्यामुळे उद्योगविश्व हादरुन गेले होते. हिंडनबर्ग हा माझ्या जीवनाचा अध्याय होता, असे अँडरसन यांनी सांगितले.

मी माझ्या मित्रपरिवार आणि कुंटुबियाचं आभार मानतो. त्यावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, माझे लक्ष दुसरीकडे होते. आता मी आपल्याला भरपूर वेळ देऊ शकेल, असे त्यांनी म्हटलं आहे. मी माझ्या वाचकांचे खूप आभार मानतो, त्यांनी केलेल्या विविध सूचनांमुळे मला ताकद मिळाली आहे, असे अँडरसन यांनी म्हटलं आहे.

‘हिंडनबर्ग’ कंपनी काय आहे

  1. नेथन अँडरसन हे या कंपनीचे प्रमुख आहेत.

  2. 2017 मध्ये ही त्यांनी कंपनी स्थापन केली.

  3. कनेक्टिकट विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास त्यांनी केला आहे.

  4. फॅक्टसेट रिसर्च सिस्टम नावाच्या डेटा कंपनीत इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपन्यांबरोबर काम केलं होतं.

  5. इस्रायलमध्ये त्यांनी काही काळ रुग्णवाहिका चालवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT