Rahul Gandhi, Kangana Ranaut Sarkarnama
देश

Rahul Gandhi Vs Kangana Ranaut : राहुल गांधी खतरनाक, विध्वंसक, कलंक..! खासदार कंगना एवढ्या का भडकल्या?

Rajanand More

New Delhi : सेबीच्या प्रमुख माधवी बुच यांची अदानी उद्योगसमुहात भागीदारी असल्याचा खळबळजनक दावा हिंडनबर्ग रिसर्चने केला आहे. त्यानंतर भारतातील राजकारण तापलं असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावरून भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी विरोधी पक्षनेत्या राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

कंगना रनौत यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राहुल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींसाठी त्यांनी खतरनाक, कलंक, विषारी, विध्वंसक अशा शब्दांचा वापर केला आहे. त्यांचा अजेंडा देशविरोधी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

काय म्हणतात कंगना रनौत?

कंगना यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी हे खूप खतरनाक आहे. विषारी, आणि विध्वंसक आहेत. पंतप्रधान होता आले नाही तर ते देश नष्ट करू शकतात, हा त्यांचा अजेंडा आहे. हिंडनबर्ग रिपोर्ट आपल्या शेअर बाजाराला लक्ष्य करतो. त्याचे राहुल गांधींनी समर्थन केले आहे. तो रिपोर्ट निरर्थक ठरला आहे.

देशातील सुरक्षा आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी, तुम्ही संपूर्ण आयुष्य विरोधात बसण्यासाठी तयार राहा. देशातील लोकांचा राष्ट्रवाद, गर्व आणि गौरव पाहून तुम्ही असेच निराश होत राहाल. येथील जनता कधीही तुम्हाला नेता मानणार नाही. तुम्ही एक कलंक आहात, अशी ठीका कंगना यांनी केली आहे.

राहुल गांधींची जेपीसीची मागणी

हिंडनबर्गच्या रिपोर्टवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी केली होती. सेबीच्या अध्यक्षांविरोधातील आरोपांमुळे संस्थेविषयी संशय निर्माण जाला आहे. सुप्रीम कोर्ट या प्रकरणाची पुन्हा दखल घेणार का, असा प्रश्नही राहुल यांनी उपस्थित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेपीसीच्या चौकशीला एवढे का घाबरतात, हे आता स्पष्ट झाले आहे. गुंतवणूकदारांची कमाई बुडाली तर त्याला कोण जबाबदार असेल, पंतप्रधान मोदी, सेबी अध्यक्ष की गौतम अदानी, असा प्रश्न राहुल यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT