Shashi Tharoor : शशी थरूर यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक; शेख हसीना यांचीही काळजी...

Bangladesh Crisis Sheikh Hasina Narendra Modi : मागील काही दिवसांपासून शेख हसीना भारतात आहेत. पुढील किती दिवस त्या भारतात असतील, याबाबत अनिश्चितता आहे.
Sheikh Hasina, Narendra Modi, Shashi Tharoor
Sheikh Hasina, Narendra Modi, Shashi TharoorSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : बांगलादेशात आगडोंब उसळल्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत पलायन केले. तेव्हापासून त्या भारतात आश्रयाला आहेत. त्यांच्याविषयी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी त्यांच्याविषयी काळजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुकही केले आहे.

शेख हसीना आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगत थरूर म्हणाले, आपण त्यांची मदत केली नाही तर ही भारतासाठी लाजीरवाणी बाब असेल. त्यांचे आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असून जर आपला मित्र अडचणीत असेल त्याच्या मदतीसाठी आपण मागेपुढे पाहत नाही. भारतानेही तेच केले. त्यासाठी मी सरकारचे कौतुक करतो.

Sheikh Hasina, Narendra Modi, Shashi Tharoor
Pooja Khedkar : पूजा खेडकर यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; UPSC, दिल्ली पोलिसांना नोटीस

एक भारतीय म्हणून आपण जगासमोबर एक उदाहरण ठेवले आहे. केंद्र सरकारने शेख हसीना यांना भारतात आणून त्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेतली, हे योग्य केले, असे म्हणत थरूर यांनी मोदी सरकारचे आभार मानले. तसेच शेख हसीना यांना किती दिवस भारतात राहायचे आहे, हा त्यांचा निर्णय असेल. आपण एखाद्याला घरी बोलवून कधी जाणार असे विचारत नाही, असेही थरूर यांनी ‘एनडीटीव्ही’शी स्पष्ट केले.

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांविषयी थरूर म्हणाले, अल्पसंख्यांकावर हल्ले झाल्याचे कुणीच अमान्य करत नाही. ते सत्य आहे. त्याचप्रमाणे तेथील मुस्लिम हिंदू कुटुंब आणि मंदिरांच्या रक्षणासाठी पुढे येत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे काही चांगल्या गोष्टीही तिथे घडत आहेत. मोहम्मद यूनुस यांनी अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेविषयी केलेले भाष्य सकारात्मक आहे.

Sheikh Hasina, Narendra Modi, Shashi Tharoor
VK Pandian : नवीनबाबूंच्या प्रिय ‘व्हीकें’ची हवाई सफर वादात; भाजप सगळंच बाहेर काढणार...

मोहम्मद यूनुस यांच्याविषयी सर्वांनाच खूप आदर आहे. त्यामुळे बांगलादेशातील अंतरिम सरकारमुळे भारताला चिंता करण्याची गरज नाही. बांगलादेशातील लोकांचे भले व्हावे, ही आपलीही इच्छा आहे. आपण 1971 पासून त्यांच्यासोबत आहोत. बांगलादेशसोबत आपण नेहमीच चांगले संबंध ठेवले, मग ते सरकार कुणाचेही असो. यापुढेही ते तसेच राहतील, असा विश्वास थरूर यांनी व्यक्त केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com