PM Modi US Visit: Sarkarnama
देश

PM Modi US Visit: पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात हॉलिवूड अभिनेत्री करणार सूत्रसंचालन; इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट

PM Narendra Modi भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जूनपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत.

सरकारनामा ब्यूरो

PM Modi US Visit: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जूनपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. 23 जूनपर्यंत अमेरिकेत राहणार आहेत. मोदींच्या दौऱ्याची अमेरिकेत जोरदार तयारी सुरू आहे. अमेरिकेत होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत.

अशा परिस्थितीत प्रसिद्ध आफ्रिकन-अमेरिकन हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यात आयोजित कार्यक्रमात परफॉर्म करणार आहेत. 'जन गण मन' आणि 'ओम जय जगदीश हरे' हे राष्ट्रगीत गाऊन भारतात प्रसिद्धी मिळवणारी मेरी, संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या उत्तर लॉनमध्ये पंतप्रधान मोदींसोबत (Narendra Modi) 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभागी होणार आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला

मेरी मिलबेन या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहेत. तिने आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. 'मी संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षा साबा कोरोसी, संयुक्त राष्ट्रातील (भारताच्या) स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज आणि न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांच्यासमवेत अमेरिकेत पंतप्रधान मोदींचे त्यांच्या पहिल्या कार्यक्रमात स्वागत करणार आहे. (International Politics)

विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी अमेरिकेत जोरदार तयारी सुरू आहे. जो बायडेन आणि त्यांची पत्नी 22 जून रोजी पीएम मोदीं यांचा पाहुणचार करणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत, हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन म्हणाली की, 'आमंत्रणाबद्दल मला समितीचे आभार मानायचे आहेत. या वर्षीच्या G20 शिखर परिषदेचे ब्रीदवाक्य 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य आहे' आणि या विधानाअंतर्गत पुढील आठवड्यात आम्ही पंतप्रधानांचे अमेरिकेत स्वागत करू. हे ब्रीदवाक्य अमेरिका आणि भारत यांच्यातील महत्त्वाच्या लोकशाही युतीची भावना प्रतिबिंबित करते. वॉशिंग्टन डीसी येथे परदेशातील भारतीयांच्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे स्वागत करणे हा मोठा सन्मान आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT