Ganesh Sugar Factory Result : विखे पाटलांना होमग्राउंडवर धक्का; थोरात-कोल्हे पॅनलची विजयाकडे घोडदौड

Ahmednagar Politics News : या निवडणुकीत विखे पाटील यांच्यासाठी धक्कादायक निकाल आहे.
Ganesh Sugar Factory
Ganesh Sugar Factory Sarkarnama
Published on
Updated on

Nagar Vikhe Vs Thorat News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहता मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांच्या पॅनेलचे मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत विखे पाटील यांच्यासाठी धक्कादायक निकाल आहे. थोरात-कोल्हे गटाने मोठी आघाडी घेतली आहे.

राहाता गटातून थोरातांचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. आत्तापर्यंत एकुण सहा उमेदवार निवडून आले आहेत. त्यापैकी थोरात-कोल्हे गटाला पाच जागा मिळाल्या आहेत. तर अवघ्या एका जागेवर विखे गटाला समाधान मानावे लागेल आहे. 19 पैकी 18 जागा थोरात कोल्हे गटाला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. थोरात कोल्हे गटाची जवळपास सातशे मतांनी आघाडी आहे. यामुळे अनेक वर्षांपासून कारखान्यावर असलेली विखे पाटलांची सत्ता जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Ganesh Sugar Factory
Ajit Pawar News : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणार का? अजित पवार म्हणाले...

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Sugar Factory Election) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (RadhaKrishna Vikhe Patil) यांच्याविरोधात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी एकत्रित पॅनेल उभा केला आहे.

Ganesh Sugar Factory
Nilesh Lanke News : निलेश लंकेंची विखे पाटलांवर टीका; म्हणाले, "माझी आमदारकी जनता ठरवेल, पण तुमच्या पुत्राची खासदारकी..."

त्यात पहिला निकाल विखे पाटील यांच्या बाजूने लागला होता. मात्र, ऊस उत्पादक गटातून तीन उमेदवार विजयी झाल्याने थोरात-कोल्हे यांच्या पॅनेलने आघाडी घेतली. नगर जिल्ह्यातील थोरात विरुद्ध विखे पाटील संघर्ष गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही दिसून आला. विखे पाटील यांच्या राहता मतदारसंघातील साखर कारखान्याच्या निवडणुकीत थोरात आणि विवेक कोल्हे यांचे पॅनेलने विखे पाटील पॅनेलला जोरदार आव्हान दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com