Winning Strategy of DK Shivkumar:
Winning Strategy of DK Shivkumar: Sarkarnama
देश

DK Shivkumar on Karnataka: उपमुख्यमंत्री पदासाठी कसे तयार झाले डीके शिवकुमार? 'हे' आहे कारण

सरकारनामा ब्युरो

DK Shivkumar Commnets on Deputy CM Post: कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी सिद्धारामय्या यांची काँग्रेसने नुकतीच घोषणा केली. तर डीके शिवकुमार (DK Shivkumar) हे कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री होणार आहेत. येत्या 20 मे 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे. पण दुसरीकडे, डीके शिवकुमार काहीसे नाराज असल्याचंही बोललं जात आहे. डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यामागचं कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (How did DK Shivakumar ready for the post of Deputy Chief Minister? 'This' is because )

असे असले तरी डीके शिवकुमार यांनी पक्षाचा निर्णय मान्य कसा केला, त्यामागचं कारण काय, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण राज्याच्या हितासाठी आपण पक्षाचा निर्णय मान्य केल्याचं डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश यांनी म्हटलं आहे. आम्हाला कर्नाटकच्या जनतेला दिलेली वचने पूर्ण करायची आहेत. त्यामुळेच डीके शिवकुमार यांनी हा निर्णय स्वीकारल्याचं डीके सुरेश यांनी म्हटलं आहे. डीके शिवकुमार यांना अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. डीके शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही प्रार्थना केली होती. पण तसं होऊ शकलं नाही. पण आम्हा वाट पाहू, आम्हाला अजून मोठा पल्ला गाठायचा असल्याचंही डीके सुरेश यांनी म्हटलं आहे. (Karnataka Election 2023)

त्याचवेळी स्वत: डीके शिवकुमार यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. “पक्षाच्या हितासाठी” उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार असल्याचं डीके शिवकुमार यांनी म्हटलं आहे. आमची कर्नाटकशी बांधिलकी आहे. लोकसभा निवडणुका आहेत. त्यामुळे पक्षाच्या व्यापक हितासाठी मी फॉर्म्युला मान्य केला आहे.आता कर्नाटकची सेवा करण्याची माझ्यावर अधिक जबाबदारी आहे, असंही शिवकुमार यांनी म्हटलं आहे. (Karnatak Politics)

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, "काँग्रेस अध्यक्षांनी सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार यांना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार स्थापनेनंतर काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या पाच वचनांच्या अंमलबजावणीला आमचे प्राधान्य राहणार आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनांवर निर्णय घेतला जाईल. आम्ही समविचारी पक्षाला शपथविधीसाठी आमंत्रित करू.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT