DK Shivakumar News: 'या' पाच कारणांमुळे डी.के. शिवकुमार यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलं!

Karnataka New Government : ''...आणि सिध्दारामय्या यांचं पारडं जड झालं!''
DK Shivakumar News
DK Shivakumar NewsSarkarnama

Karnataka News : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार याचं अखेर उत्तर मिळालं आहे. सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी तर उपमुख्यमंत्रीपदी डी के शिवकुमार विराजमान होणार आहेत. काँग्रेस हायकमांडंकडून या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मात्र,सुरुवातीला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले डीके शिवकुमार अचानक पाठीमागं पडले आणि सिध्दारामय्या यांचं पारडं जड झालं. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनीही अखेर सिध्दारामय्या यांच्या नावालाच कौल दिला. या पाच फॅक्टरमुळेच शिवकुमार यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नं भंगल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपवर दारुण पराभवाचा धक्का देत काँग्रेसनं ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल १३५ जागा जिंकत काँग्रेस(Congress) बहुमतानं सत्तेत आली. पण ज्या दोन दिग्गज नेत्यांमुळे काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत विजय मिळाला. त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकण्यात आला. आणि अखेर ज्या गोष्टीची भीती पक्षाला होती त्या मुख्यमंत्रीपदावरुन नवा तिढा निर्माण झाला. पण यात सिध्दारामय्या यांनी बाजी पलटवली आणि डीके शिवकुमार यांचा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतला पत्ता कट झाला.

DK Shivakumar News
Vinod Tawade News : भाजप हायकमांडचे विनोद तावडेंना पाठबळ; फडणवीस समर्थकांमध्ये अस्वस्थता!

कर्नाटकमधील मुख्यमंत्रीपदावरुन सिध्दारामय्या व डीके शिवकुमार( DK Shivakumar) हे दोन्हीही नेते दिल्ली दरबारी ठाण मांडून बसले होते. कर्नाटक ते दिल्लीपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. पण या दरम्यान दोन्ही नेत्यांनी या घडामोडींवर भाष्य करण्याचं टाळत पक्षावरूल दबाव वाढवला होता. पण आता 20 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

काँग्रेस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या शिवकुमार यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महत्त्वाचे खाते देण्याचे आश्वासन काँग्रेस हायकमांडने दिले असले तरी या पाच फॅक्टरमुळेच शिवकुमार यांचं मुख्यमंत्रीपदा(Chief Minister) चं स्वप्नं भंगल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

DK Shivakumar News
Karnataka Governemt : मोठी बातमी! सिध्दरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री,डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री...

'हे' मुद्दे ठरले शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीतले अडथळे...

केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर...

डीके शिवकुमार गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. शिवकुमार यांच्यावर 19 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी काही सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत तपासल्या जात आहेत. ते तुरुंगातही गेले आहेत.

श्रीमंत नेता प्रतिमा धोकादायक...

शिवकुमार हे सर्वात श्रीमंत आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्याकडे 1214 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांना श्रीमंत नेता मानले जाते. तर सिद्धरामय्या हे तळागळातील नेते मानले जातात. श्रीमंत नेता अशी प्रतिमाही त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात ठरल्याचे मानले जाते.

DK Shivakumar News
DRDO director : प्रदीप कुरूळकर हनी ट्रॅप प्रकरणात नागपुरातील निखिलचे नाव, काय आहे संबंध?

आमदारांचा सिद्धरामय्यांना पाठिंबा...

कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांचा निर्णय हायकमांडने घ्यावा, असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र या बैठकीत बहुतांश आमदारांनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्याबाबत चर्चा केली होती. पण डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून किती आमदारांचा पाठिंबा किंवा समर्थन आहे हे त्यांना सांगता आले नाही.

प्रशासकीय अनुभवाचा अभाव

शिवकुमार हे काँग्रेसचे निष्ठावंत आहेत. 1989 पासून ते 8 वेळा आमदार झाले आहेत. ते एक आक्रमक नेते समजले जातात. कर्नाटकातील ऑपरेशन लोटस दरम्यान आमदारांना एकसंध ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण ते मंत्री राहिले पण सिद्धरामय्यांपेक्षा प्रशासकीय अनुभव कमी आहे.

DK Shivakumar News
Congress News : सिद्धरामय्यांनीच आम्हाला काँग्रेस सोडायला भाग पाडले : माजी मंत्री सुधाकर, सोमशेखर यांचा गौप्यस्फोट

एका समाज, प्रदेशाचा नेता...

डीके हे कर्नाटकातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या वोक्कलिगा समुदायातील सर्वात मोठे नेते आहेत. कर्नाटकातील 50 जागांवर या समाजाचा प्रभाव असल्याचे मानले जाते. डीके यांची संघटनेवर असलेली पकड मानली गेली असली, तरी कुठेतरी त्यांची प्रतिमा एका समाजाचा, प्रदेशाचा नेता अशी राहिली आहे. ते सिद्धरामय्यांसारखे लोकप्रिय जनतेत नाहीत.

2024 मध्ये काँग्रेसला तोटा होण्याची शक्यता...

इतकेच नाही तर काँग्रेसने डीके यांना मुख्यमंत्री केले असते तर वोक्कलिगा समाजाकडे अधिक लक्ष दिल्याचा संदेश गेला असता. अशा स्थितीत काँग्रेससह अन्य समाजातील मतदार नाराज होऊ शकले असते. त्यामुळे 2024 मध्ये काँग्रेसला तोटा सहन करावा लागू शकतो.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com