Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
देश

NCP Crisis : शरद पवारांच्या वकिलांचा एकच प्रश्न; अजितदादांचा डाव उलटवणार ?

Ganesh Thombare

Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष चिन्हाच्या वादावर निवडणूक आयोगात सोमवारी पुन्हा सुनावणी झाली. या वेळी दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. अजित पवार गटाकडून वकील ॲड. नीरज किशन कौल आणि मानिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला, तर शरद पवारांकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला.

अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात दिलेल्या उत्तरात बहुसंख्य आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या सहमतीने राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सामील झाला असल्याचेही अजित पवार गटाने स्पष्ट केले. यानंतर शरद पवारांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलाने अजित पवार गटासोबत किती आमदार आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अजित पवारांसोबत नेमके किती आमदार आहेत ? आमदारांचा फक्त आकडाच नाही तर नावंदेखील सांगा, असा एकच प्रश्न अभिषेक मनू सिंघवी यांनी विचारला. त्यामुळे आता हा प्रश्न अजित पवार गटाला अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाने काय युक्तिवाद केला ?

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाहीचा अभाव आहे. पक्षावर कोणताही एक व्यक्ती दावा करू शकत नाही. सध्या पक्षामध्ये अशीच परिस्थिती आहे. शरद पवार हे आपल्या घराप्रमाणे पक्ष चालवत होते", असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.

"आमच्याकडे दीड लाखापेक्षा जास्त शपथपत्र असून, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे आमच्यासोबत (अजित पवार गट) आहेत. प्रफुल्ल पटेलांच्या सहीनेच नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत", असा दावा अजित पवार गटाकडून करण्याता आला.

तसेच अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात शिवसेनेच्या केसचाही दाखला देण्यात आला. याबरोबरच अजित पवारांची निवड योग्यच असून, शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले, असाही युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला.

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सुनावणीनंतर सोमवारच्या सुनावणीतदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. तसेच शरद पवार हे घर चालवल्यासारखे पक्ष चालवत होते. निवडणूक न घेताच पवारांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली, पवारच निवडून आलेले नाहीत, तर मग इतरांची निवड कशी केली, असा सवालही अजित पवार गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी उपस्थित केला. त्यामुळे आजच्या सुनावणीत दोन्ही गटांत जोरदार घमासान झाले.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT