NCP Hearing : शरद पवारच निवडून आलेले नाहीत, मग इतरांच्या निवडी योग्य कशा?; अजितदादा गटाचा आक्षेप

Election Commission : पक्षामधील अंतर्गत निवडणुका या लोकशाहीप्रमाणे होत नाहीत.
Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : शरद पवार हे घर चालवल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवत होते. निवडणूक न घेताच पवारांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पवारच निवडून आलेले नाहीत, तर मग इतरांची निवड कशी केली, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी उपस्थित केला आहे. (Sharad Pawar has not been elected, so how are the choices of others correct?)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर अजित पवार गटाकडून दावा करण्यात आलेला आहे. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यात उपमुख्यमंत्री पवार यांच्या गटाकडून नीरज किशन कौल यांनी सुरुवातीला युक्तिवाद केला. त्यानंतर ते न्यायालयातून बाहेर पडले.

Ajit Pawar-Sharad Pawar
Raj Vs Fadnavis : राज ठाकरेंच्या टोलसंदर्भातील आरोपाला फडणवीसांचे आकडेवारीसह उत्तर...

पक्षामधील अंतर्गत निवडणुका या लोकशाहीप्रमाणे होत नाहीत. आम्ही एक लाखाच्या आसपास ॲफिडेव्हिट दिली आहेत. दुसऱ्या गटाकडून केवळ ४० हजारांपेक्षाही कमी आहेत, असेही ॲड. कौल यांनी सांगितले.

युक्तिवादात ॲड. कौल यांनी सादिक अली शेख प्रकरणाचा उल्लेख करत त्यात आमदारांचे संख्याबळ गृहीत धरण्यात आले होते. त्यामुळे आमदारांच्या संख्येला महत्त्व आहे, असा दावाही करण्यात आला. शिवसेनेच्या केसचा उल्लेख अजित पवार गटाचे वकील नीरज किशन कौल यांच्याकडून सातत्याने करण्यात आला.

पी. ए. संगमा यांच्या केसचाही या वेळी उल्लेख करण्यात आला. ॲड. मनिंदर सिंग यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची घटना निवडणूक आयोगासमोर वाचून दाखवली. शरद पवार यांची निवडच कायदेशीरदृष्ट्या योग्य पद्धतीने झालेली नाही. त्यामुळे पुढील नियुक्त्या या फक्त कागदावरील नियुक्त्या आहेत, असेही युक्तिवादात सांगण्यात आले.

Ajit Pawar-Sharad Pawar
Attack On Heramb Kulkarni : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला

जे स्वतः निवडून आलेले नाहीत, ते नेमणुका कशा करू शकतात, असाही आक्षेप घेण्यात आलेला आहे. पदाधिकाऱ्यांच्या केवळ नेमणुका व्हायच्या, निवडणुका होतच नव्हत्या, असा दावाही अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर करण्यात आला. तसेच पवारांच्या कथित मनमानींवर आज पुन्हा आक्षेप घेण्यात आलेला आहे.

पवारांच्या अध्यक्षपदाला दुसऱ्यांदा आक्षेप

दरम्यान, शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला पी. ए. संगमा यांनीही पक्षातून बाहेर पडल्यानंतर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, त्या प्रकरणात पवारांच्या बाजूने निकाल लागला होता. कारण त्यावेळी महाराष्ट्र आणि इतर राज्ये ही शरद पवार यांच्या बाजूने उभी राहिली होती. आता मात्र महाराष्ट्रातून आव्हान देण्यात आलेले आहे.

Ajit Pawar-Sharad Pawar
Israel-Palestine War : इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धाचा खिशाला बसणार चाट; कच्चा तेलाचे दर भडकण्याची शक्यता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com