Rahul Gandhi News : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबाबत अनेकदा प्रश्न विचारले जातात. पण अनेक वेळा ते या प्रश्नाच उत्तर टाळताना दिसून आले. मात्र त्यांनी पहिल्यांदाच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या विशेष मुलाखतीत लग्नाबाबत विचारेलल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. तसेच या मुलाखती दरम्यान त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. लग्नाबाबत विचारेलल्या प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तराची मात्र सर्वत्र चर्चा रंगली आहे.
विरोधकांकाडून सातत्याने राहुल गांधींचा पप्पू असा उल्लेख केला जातो? या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, ''कोणी'पप्पू' म्हटलं तर वाईट वाटण्याचं काही कारण नाही. कारण हा सर्व प्रचाराचा भाग असतो. उलट जे असं बोलतात त्यांच्या मनात भीती असते. त्यांच्या आयुष्यात काहीच घडत नाही. उलट मला जर शिवी देण्याची गरज असेल तर शिवी द्या मी त्याचं स्वागत करेन'', असं उत्तर त्यांनी दिलं.
तुमच्या आजीला भारताची आयर्न लेडी म्हटलं जात? या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, ''जे माझ्यावर चोवीस तास हल्ला करतात तेच लोकं इंदिराजींना मुकी बाहुली म्हणत होते. मात्र त्या आयर्न लेडी बनल्या अणि त्या नेहमीच आयर्न लेडी होत्या''.
तुमच्याकडे कार आणि बाईक आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, ''माझ्याकडे एकही गाडी नाही. मी माझ्या आईच्या गाड्या चालवतो. मला गाडी चालवायला आवडते. माझ्याकडे मोटार बाईक देखील आहे. मला वेगाने चालायला सर्वात जास्त आवडतं. जेव्हा मी लंडनमध्ये राहात होतो त्यावेळी मी आरएस २० बाईक चालवायचो. ते माझ्या आयुष्यातील एक प्रेमच होतं''.
सायकल चालवायला आवडते का? या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, ''हो मला सायकल चालवायला खूप आवडते. एकेकाळी लॅम्ब्रेटा अर्थात स्कूटर माझी आवडती होती. पण आपल्याकडे आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनामध्ये भारत अजूनही मागे आहे''.
लग्नासाठी कशी मुलगी हवीय? असा प्रश्न त्यांना विचाण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, ''माझी आजी इंदिरा गांधी आणि माझी आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या सारखे गुण असणारी मुलगी मला लग्नासाठी हवी आहे. माझी आजी माझ्या आयुष्यातील प्रेम होती. माझी आजी ही दुसरी आईच होती'', असं उत्तर त्यांनी दिलं.
दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या 'भारत जोडो यात्रे'त चालत आहेत. यावेळी ते वेगवेगळ्या लोकांना भेटत आहेत, बोलत आहेत. तसेच राहुल गांधी हे पहिल्यांदाच आपल्या लग्नाबाबतच्या प्रश्नावर मन मोकळे बोलले आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेल्या उत्तराची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.