Sharad Pawar : "धोरणांबाबत मतभेद असतील, तरीही काँग्रेसला सोबत घेऊनच देशाचं राजकारण!"

Sharad Pawar : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत पुण्यातील कॉंग्रेस भवनचे मोठे योगदान!
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Pune News : आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा (Congress) वर्धापन दिनामित्तदेशभरात काँग्रेसकडून हा दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सर्व राज्यात जोरदार तयारी करणयात येत आहे. पुण्यातही काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा होत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये उपस्थित राहिले होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, मी सर्वप्रथम 1958 साली या कॉंग्रेस भवनमधे आलो होतो. आज अनेक वर्षांनी पुन्हा कॉंग्रेस भवनमधे आलो आहे. त्याकाळात काँग्रेसमध्ये अनेक नेते कार्यरत होते. पुणे त्याकाळी काँग्रेसमय होतं. पुणे म्हणजे कॉंग्रेस आणि कॉंग्रेस म्हणजे पुणे, असंच पुण्याचं समीकरण होतं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुण्यातच काँग्रेसचं केंद्र होतं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा कारभार पुण्यातील काँग्रेस भवन या ऐतिहासिक वास्तूतूनच चालत असे. इथूनच काँग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधीच्या माध्यमातून नेहरुंची समजूत घातली आणि संयुक्त संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत पुण्यातील कॉंग्रेस भवनचे योगदान मोठे आहे.

Sharad Pawar
Raj Thackeray : राज ठाकरेंची नवी ऑफर; राजकारणात येण्याची इच्छा असेल तर मला भेटा...

"कॉंग्रेसच्या काही धोरणांबाबत मतभेद असतील, आमचेही काही मतभेद आहेत.पण कॉंग्रेसला सोबत घेऊनच देशाचं राजकारण करावं लागेल.आताचे सत्ताधारी सत्तेचा दुरूपयोग करत आहेत. सत्तेचा दुरूपयोग करणाऱ्यांशी आपल्याला एकजुटीने लढावं लागेल," असेही पवार म्हणाले.

"काही लोक कॉंग्रेसमुक्त भारत करायचं असे म्हणतात, पण कॉंग्रेसमुक्त भारत होऊचशकत नाही. देशाच्या जडणघडणीत कॉंग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही, " असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar
Pune Congress : तब्बल 24 वर्षानंतर शरद पवार पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये : चहापानाचं निमंत्रण स्वीकारलं!

"आताचे सत्ताधारी सत्तेचा दुरूपयोग करत आहेत. सत्तेचा दुरूपयोग करणाऱ्यांशी आपल्याला एकजुटीने लढावं लागेल. आज जो कोर्टाचा निकाल लागला, त्यातून राज्यकर्त्यांना काही सदबुद्धी घ्यावी, हा निकाल त्यांना विचार करायला लावणारा आहे.  कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला निमंत्रित केले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो," असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com