Indian Army News : भारताने हल्ला केल्यास जशास तसे उत्तर देण्याची भाषा पाकिस्तानचे नेते करत आहेत. पण या पोकळ धमक्या असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. पाकिस्तानने भारतासोबत युध्द पुकारल्यास त्यांच्या सैन्याचा भारतासमोर जेमतेम आठवडाभरही निभाव लागणार नाही. केवळ चार दिवसांतच त्यांना लोटांगण घालावे लागेल, इतकी दयनीय स्थिती असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील महिन्यांतील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी त्यांचे नाक-तोंड दाबण्यास सुरूवात केली आहे. सिंधू जलकरार रद्द करण्यासह अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड होत आहे. तेथील नेते भारताला आण्विक युध्दाच्या धमक्या देत आहेत. रक्ताचे पाट वाहतील, अशी भाषा करत आहेत.
पाकिस्तानच्या या धमक्यांमध्ये काहीच दम नसल्याची माहिती समोर आली आहे. युध्दात भारतासमोर लढण्यासाठी पाकिस्तानकडे केवळ चार दिवस पुरेल एवढाच शस्त्रसाठा आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या आधारे वृत्त दिले आहे. पाकने नुकताच इस्त्राईल आणि युक्रेनसोबत शस्त्रांबाबत करार केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडील साठा कमी झाला असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
पाकमधील ऑर्डिनन्स फॅक्टरींमधील जुनाट मशिनरी आणि वाढत्या मागणीमुळे शस्त्रास्त्रे वेळेत पुरविणे शक्य होत नाही. त्यामुळे घनघोर युध्द झाल्यास पाकिस्तानची केवळ 96 तासांतच वाताहत होईल, अशी स्थिती आहे. या स्थितीमुळे पाकिस्तानी लष्करातील अधिकारीही चिंतेत असल्याचे वृत्त आहे. दोन दिवसांपूर्वीच एका महत्वाच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित झाला होता.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांनीही लष्कराकडील अपुऱ्या शस्त्रांबाबत चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, पाकिस्तानने सीमेवर शस्त्रास्त्रांचे डेपो उभारल्याचा दावाही केला जात आहे. भारताने हल्ला केल्यास तातडीने उत्तर देता यावे, हा त्यामागचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे या भागात मशिदी आणि पर्यटनही पुढील काही दिवसांसाठी बंद केल्याचे वृत्त आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.