YS Sharmila Slapped Policemen
YS Sharmila Slapped Policemen  Sarkarnama
देश

YSRTP च्या प्रमुख वायएस शर्मिलांनी पोलिसाच्या श्रीमुखात लगावली ; Video व्हायरल

सरकारनामा ब्यूरो

YS Sharmila Slapped Policemen : तेलंगणामध्ये युवजन श्रमिक रायथू तेलंगणा पार्टीच्या (YSRTP) प्रमुख वायएस शर्मिला यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. रस्त्यावर गोंधळ घातल्याच्या कारणावरुन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांसोबत त्यांची शाब्दीक चकमक झाली, त्यानंतर वायएस शर्मिला यांनी एका पोलिसाच्या कानशीलात लगावली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. YSRTP च्या प्रमुख वायएस शर्मिला या TSPSCच्या प्रश्नपत्रिका लीक प्रकरणात त्या एसआयटी (SIT) कार्यालयात जात होत्या.

पोलिसांनी त्यांना रस्त्यात अडविण्याचा प्रयत्न केला . तेव्हा हा प्रकार घडला. वायएस शर्मिला यांना अडविण्यात आले तेव्हा पोलीस आणि त्यांच्यात मोठा वाद झाला.

वायएस शर्मिला यांनी थेट पोलिसाच्या कानशीला लगावली. त्यांनी महिला पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यानंतर रस्त्यावर धरणे आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

नेमकं काय घडलं

वायएस शर्मिला या SITच्या कार्यालयात जात असताना त्यांची गाडी पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या गाडीचा चालक गाडी मागे-पुढे करीत होता. त्यांच्या गाडीच्या मागे-पुढे पोलिसांची धावपळ सुरु होती.

तेव्हा वायएस शर्मिला या अचानक गाडीतून खाली उतरल्या. काही काळ त्या पायी चालत होत्या. नंतर त्यांनी रस्त्यावर धरणे आंदोलन सुरु केले. त्यानंतर पोलीस आणि त्यांच्यात राडा झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT