Supriya Sule On Supreme Court  Sarkarnama
देश

Supriya Sule On Supreme Court : कोर्टाची पायरी चढेन असं वाटलं नव्हतं, पण... ; सुप्रिया सुळेंचा सूचक इशारा !

Supriya Sule On Supreme Court : "...पण सत्याच्या विजयासाठी जे काही करावं लागेल ते करणार!"

Chetan Zadpe

New Delhi News : आयुष्यात पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढली आहे. राजकारणाच्या क्षेत्रात मी कधीच कोर्टबाजीसाठी आलेली नाही. सर्वसामान्य जनतेची सेवा, त्यांच्यासाठी धोरणांसाठी मी राजकारणात आहे. मला कधी वाटलंही नाही, की कोर्टाची पायरी चढायची वेळ माझ्यावर येईल; पण सत्याच्या विजयासाठी जे काही करावं लागेल ते करणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते अन् राज्याच्या जनतेसाठी आम्ही इथे आहोत, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भावना व्यक्त केली. (Latest Marathi News)

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या दिरंगाईसंदर्भातल्या याचिकांवरची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आज सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या या प्रकरणातील कार्यवाहीबाबत अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या सुनावणीसाठी सुप्रिया सुळे दिल्लीत उपस्थित होत्या.

सुळे म्हणाल्या, "आताच्या घडीला प्रकरण न्यायालयातलं आहे. याबाबत अनिल परब यांनी माहिती दिली होती. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट ) दिरंगाईसंदर्भात एकत्र याचिका दाखल केल्या आहेत. आम्हाला विश्वास आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांना न्याय मिळेल. आमची ही नैतिक लढाई आहे, व्यक्तिगत पातळीवर कुठेच लढाई नाही. सत्य आणि असत्यामधील ही लढाई आहे. शरद पवार आता निवडणूक लढवणार नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादी-शिवसेना लढत असलेली नाही. शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे ही लढाई जनतेची आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

विधानसभेचे अध्यक्ष आमदार अपात्रता प्रकरणात दिरंगाई करत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकांवर एकत्र सुनावणीची प्रक्रिया पार पडली. यासाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, तर ठाकरेंकडून खासदार अनिल देसाई सुनावणीसाठी उपस्थित होते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT