Shiv Sena MLC Disqualification : आमदारांविरोधातल्या याचिकेवर सुनावणीस विलंब? ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात...

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : "गोऱ्हे यांच्याविरोधात याचिका असल्याने त्यांनी स्वत: विरोधातील याचिकेवर सुनावणी घेऊ नये..."
Shiv Sena MLC Disqualification Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Shiv Sena MLC Disqualification Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधान परिषदेतील शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांबाबतच्या सुनावणीत संदिग्धता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधान परिषद आमदार सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विक्रम काळे, अनिकेत तटकरे यांच्याविरोधात अपात्रता याचिका सादर केल्या आहेत, तर जितेंद्र आव्हाड यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधात याचिका सादर केली आहे.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

या याचिकांवर कार्यवाही सुरू असून, पुढील आठवड्यात संबंधितांना बाजू मांडण्यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून नोटिसा पाठविल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसंदर्भातील अपात्रता याचिकांवरील प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Shiv Sena MLC Disqualification Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Rahul Narwekar Delhi Tour: राहुल नार्वेकर दिल्लीला का गेले? संजय शिरसाटांनी सांगितले नेमके कारण...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रतोद अनिल परब यांनी शिंदे गटात गेलेल्या उपसभापती डॉ. गोऱ्हे, आमदार मनीषा कायंदे, आमदार विप्लव बजोरिया यांच्याविरोधात अपात्रतेच्या याचिका सादर केल्या आहेत. सभापतीपद सध्या रिक्त असल्याने या याचिका डॉ. गोऱ्हे यांच्यापुढे सुनावणीसाठी येणे अपेक्षित होते. मात्र, ठाकरे गटाच्या या याचिका डॉ. गोऱ्हे यांच्यापुढे सादर झाल्या नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

Shiv Sena MLC Disqualification Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Sadabhau Khot On NCP : राज्य सरकारला सोडलं अन् सदाभाऊंनी शरद पवार - रोहित पवारांविरोधात काढला गळा...

यासंदर्भात अनिल परब म्हणाले, "तीन आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर त्यांना अपात्र ठरविण्याबाबत मी स्वत: विधिमंडळ सचिवालयात याचिका सादर केल्या आहेत. त्या कुठे गायब झाल्या आहेत का, हे तपासले जाईल. डॉ. गोऱ्हे यांच्याविरोधात याचिका असल्याने त्यांनी स्वत: विरोधातील याचिकेवर सुनावणी घेऊ नये आणि याचिकेवर निर्णय होईपर्यंत उपसभापती म्हणून कामकाज पाहू नये, असा मुद्दा मी सभागृहात मांडला होता. मात्र, तो अमान्य करण्यात आला होता. शिंदे गटात गेलेल्या आमदारांविरोधातील याचिकांवरील सुनावणी तातडीने होणे अपेक्षित आहे. विलंब केल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागेल," असा इशारा परब यांनी दिला आहे.

Edited by - Chetan Zadpe

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com