नवी दिल्ली : आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी खेळाडूंना घरी पाठवणे आयएएस दांपत्याला महागात पडले आहे. गुरुवारी रात्री उशिरा दोघांची एकाचवेळी बदली करण्यात आली. गृहमंत्र्यांलयानं (Ministry of Home Affairs) ही कारवाई केली आहे. राजधानी दिल्लीतील त्यागराज स्टेडियममधील हा प्रकारामुळे दोन दिवसापासून समाजमाध्यमांवर चर्चा होती.
कुत्र्याला फिरवण्यासाठी या दांपत्याने स्टेडियमचं रिकामं केल्यानं याविषयी संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर आता गृह मंत्रालयानेने गुरुवारी रात्री उशिरा आयएएस संजीव खिरवार आणि त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांची एकाच वेळी बदली केली.
संजीव हे 1994च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत, ते सध्या दिल्लीत महसूल आयुक्त म्हणून कार्यरत होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दिल्ली आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर रात्री उशिरा आयएएस दाम्पत्यावर कारवाई करण्यात आली.
दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर संजीव खिरवार (IAS Sanjiv Khirwar) आणि त्यांच्या पत्नी रिंकू दुग्गा हे फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांचा कुत्राही त्यांच्या सोबत होता. तेव्हा स्टेडियमच्या प्रशासनानं तिथल्या सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांना संध्याकाळी सात वाजताच स्टेडियमबाहेर जाण्यात सांगितलं. नेहमी हे स्टेडियम उशिरापर्यंत सुरू असतं. याठिकाणी अनेक जण सराव करीत असतात.
या प्रकरणाची दखल घेत गृह मंत्रालयाने दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला होता. मुख्य सचिवांनी आपला अहवाल मंत्रालयाला सादर केला, त्यानंतर सरकारने या आयएएस दांपत्यावर कारवाई केली. भारत सरकारचे अवर सचिव राकेश कुमार सिंग यांनी या आयएएस जोडप्याला तत्काळ प्रभावाने बदली झालेल्या राज्यांमध्ये रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. खिरवार यांना लडाखला, तर डुग्गा यांना अरुणाचलमध्ये पाठवण्यात आले आहे. लडाख ते अरुणाचल हे अंतर सुमारे 3,100 किमी आहे.
त्यागराज स्टेडियमच्या प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.स्टेडिअमचे व्यवस्थापक अजित चौधरी म्हणाले,"खेळाडूंच्या सरावासाठी अधिकृत वेळ ७ वाजेपर्यंतच आहे. त्यानंतर सर्वजण बाहेर पडत असतात,"
याबाबत आयएएस संजीव खिरवार म्हणाले की, माझ्यामुळे खेळाडूंचा सराव बंद झाल्याची बाब निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी क्वचितच कुत्र्यासोबत ट्रॅकवर जातो. जेव्हा खेळाडू नसतात तेव्हाच मी जातो. कधीही कोणत्याही खेळाडूला स्टेडियम सोडण्यास सांगितले नाही. मीसुद्धा कुत्र्याला कुणी नसतानाच ट्रॅकवर सोडतो. जर ते आक्षेपार्ह असेल तर मी ते बंद करेन.
या बदलीबाबत जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी टि्वट करीत केंद्र सरकारवर टीका केली आहे. "लडाखचा परिसर हा सुंदर आहे. येथे अनेक महत्वपूर्ण वास्तू आहेत. पण लडाखला बदली म्हणजे शिक्षा असं लोक का समजतात," असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.